शाळा बंद करून गरिबांना हद्दपार करणार का? — शिक्षक नेते कपिल पाटील यांचा सरकारला संतप्त सवाल
मुंबई — राज्यातील सुरु असलेल्या अनुदानित शाळा आर्थिक कारण देत बंद करण्याच्या हालचालींवर संतप्त प्रतिक्रिया देत, शिक्षक नेते आणि माजी आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार, तसेच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना सोमवारी एक कडक पत्र पाठवले. शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवत, हा निर्णय गरीबांच्या शिक्षणावर घाला […]