महाराष्ट्र ताज्या बातम्या

२०३० पर्यंत ३५ लाख घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट

मुंबई: राज्याच्या गृहनिर्माण धोरण 2025 ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. ‘माझे घर, माझा अधिकार’ हे ब्रीद अनुसरून वर्ष 2030 पर्यंत राज्यातील प्रत्येक नागरिकाला शाश्वत, सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल घराचे अभिवचन देणाऱ्या राज्याच्या गृह निर्माण धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणात डाटा आधारित […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad : रस्त्यावर अपघातांचे खडीकरण! महाड पीडब्ल्यूडीचा अनोखा प्रयोग

महाड: महाड-दापोली राज्य मार्गावर अपघातांची मालिका सुरु असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघात प्रवण क्षेत्रांवर रस्ता सुरक्षेसाठी अजब उपाय सुरू केला आहे. अवकाळी पावसात डांबरीकरणाच्या निकृष्ट दर्जामुळे रस्ता घसरत असल्याने अपघात वाढले. तरीही विभागाने आता या रस्त्यावर केवळ खडी टाकून ती रोलरने दाबण्याचा ‘प्रयोग’ सुरू केला आहे. या ‘तंत्रज्ञानामुळे’ रस्ता खडबडीत होऊन अधिक अपघात घडण्याचा धोका […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

संगमनेरकरांसाठी मोठा दिलासा – शास्ती माफीसाठी राज्य शासनाची अभय योजना लागू : आमदार अमोल खताळ पाटील

संगमनेर : संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील थकित मालमत्ता करावरील शास्ती माफ करून कर वसूल करण्यासाठी राज्य शासनाने प्रोत्साहनपर अभय योजना लागू केली आहे. मार्च २०२५ मधील अधिवेशनात आमदार अमोल खताळ पाटील यांनी संगमनेर नगरपरिषद हद्दीतील नागरिकांवर अन्यायकारक पद्धतीने लावण्यात येणाऱ्या शास्ती […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोविड-१९ रुग्णांच्या उपचार आणि मार्गदर्शनाची सोय

रुग्णांसाठी महानगरपालिका रूग्णालयांमध्ये विशेष खाट आणि विशेष कक्षांची व्यवस्था के. ई. एम. रूग्णालयातील मृत्यू कोविडमुळे नाही; गंभीर सहव्याधींमुळे झाले असल्याचे तज्ञांचे मत मुंबई: कोविड-१९ आजार आता एक प्रस्थापित (endemic) आणि सतत चालणारी आरोग्य समस्या म्हणून गणला जात आहे. विषाणू वस्ती पातळीवर स्थिरावल्यामुळे, कोविड रुग्ण अधूनमधून अत्यंत कमी प्रमाणात आढळतात. सध्या सिंगापूर, हाँगकाँग, पूर्व आशिया आणि […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

“विजयोत्सव नव्हे, उत्तरदायित्व हवे!” — अमित ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना खडा सवाल

मुंबई : “दहशतवादी हल्ल्यांचा मुद्दा हा केवळ राजकीय लाभासाठी वापरण्याचा भाजपाचा प्रयत्न उघड झाला आहे,” अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते अमित ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. अलीकडेच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीयांचा बळी गेला. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशभरात भाजप व त्याच्या मित्र पक्षांकडून ‘विजयोस्तव’ साजरे केले जात आहेत. मात्र […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

रायगड समजून घ्यायचा असेल तर तो फक्त राजू देसाईंकडूनच! : सत्तरीतील शिवप्रेमींकडून गौरव

By योगेश त्रिवेदी मुंबई : “रायगड समजून घ्यायचा असेल, तर तो फक्त शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि शिवभक्त राजू देसाई यांच्याकडूनच,” अशा शब्दांत सत्तरीतील ज्येष्ठ शिवप्रेमींनी राजू देसाई यांच्या कार्याचा गौरव केला. ‘मल्ल्या-वराडकर फ्रेंड्स क्लब’ च्या ६० ते ८० वयोगटातील ज्येष्ठ सभासदांनी राजू देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले रायगड भ्रमंती केली. कडक उन्हातही, या वयोवृद्ध शिवभक्तांनी छत्रपती […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

CJI Bhushan Gawai : सरन्यायाधीशांचा अपमान घटनाविरोधी विचारसरणीचा परिपाक? : अंबादास दानवे यांचा सरकारवर गंभीर आरोप; “सरन्यायाधीशांनाही महायुती अपमानित करत आहे”

मुंबई : “महाराष्ट्राचे सुपुत्र आज देशाच्या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले आहेत. त्यांचे स्वागत प्रोटोकॉलनुसार व्हायला हवे होते, पण तसे झाले नाही. त्यांना भाड्याची गाडी दिली जाते. हे केवळ दुर्लक्ष नसून, त्यांच्या ‘संविधान सर्वोच्च आहे’ या स्पष्ट विचारामुळे सरकारने ही वागणूक दिली काय?” असा थेट आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी एका […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Vadhvan Port : एड्यु सिटी आणि नॉलेज सिटीमुळे मुंबईच्या अर्थविकासाला गती – मुख्यमंत्री फडणवीस

IFS अधिकाऱ्यांशी संवादात मुंबईच्या भविष्यातील आर्थिक व शैक्षणिक रूपरेषेची मांडणी मुंबई : मुंबईच्या पायाभूत सुविधा, शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आगामी प्रकल्पांमुळे नव्या आर्थिक युगाची सुरुवात होणार आहे. वाढवण बंदर, एड्यु सिटी, नॉलेज सिटी यांसारख्या भव्य योजनांमुळे मुंबई देशातीलच नव्हे तर जागतिक स्तरावर एक प्रभावशाली आर्थिक आणि शैक्षणिक केंद्र ठरेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

गृहनिर्माण धोरणाचा सर्वंकष आराखडा मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा : मुख्यमंत्री

मुंबई : गृहनिर्माण धोरणाच्या माध्यमातून सर्वांसाठी घरे या संकल्पनेला प्रत्यक्ष अंमलबजावणीत आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. हे धोरण सर्वसमावेशक असणार असून, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार महिला, विद्यार्थी आणि औद्योगिक कामगार यांसारख्या विविध समाज घटकांचा समावेश यात करण्यात आला आहे. प्रस्तावित गृहनिर्माण धोरणाचा सर्वंकष आराखडा मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. सह्याद्री […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

सरन्यायाधीश गवईंचा अपमान आंबेडकरी विचारांमुळेच: काँग्रेस नेते नाना पटोले यांचा सरकारवर तिरकस निशाणा

मुंबई : भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात आवश्यक शासकीय प्रोटोकॉलचे पालन न झाल्याने निर्माण झालेल्या वादावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी राज्यातील भाजपा युती सरकारवर जोरदार टीका केली. “महाराष्ट्राच्या सुपुत्राचा असा अपमान हा संपूर्ण राज्यासाठी लज्जास्पद आहे. गवई हे केवळ आंबेडकरी विचारसरणीचे असल्यामुळेच त्यांच्याशी भेदभाव झाला का?” असा थेट सवाल […]