राष्ट्रीय ताज्या बातम्या

शिवसेनेच्या युवा नेतृत्वाला आंतरराष्ट्रीय मान्यता!

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची अभिमानास्पद निवड जागतिक व्यासपीठावर मांडणार भारताची दहशतवादविरोधी भूमिका नवी दिल्ली/मुंबई : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या दहशतवादविरोधी भूमिकेला जागतिक स्तरावर अधिक ठामपणे मांडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भारत सरकारने संसदेच्या सात सर्वपक्षीय शिष्टमंडळांची निवड केली असून, ही शिष्टमंडळे अमेरिका, युरोप, मध्यपूर्व, आफ्रिका आणि आखाती देशांमध्ये दौरे करणार आहेत. या शिष्टमंडळांमध्ये […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळांमुळे दहशतवादविरोधी लढ्याला मोठे बळ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : “ऑपरेशन सिंदूरचाच एक भाग म्हणून भारताची दहशतवादविरोधी ‘झिरो टॉलरन्स’ भूमिका अधिक प्रभावीपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी खासदारांची सात सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळे वेगवेगळ्या राष्ट्रांना पाठवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी आदरणीय पंतप्रधानांचे मनापासून अभिनंदन करतो. ही भारताच्या परराष्ट्र धोरणातील एक ऐतिहासिक पायरी ठरणार आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

…तर नरकात जाऊन स्वर्ग शोधण्याची वेळ आली नसती! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संजय राऊत यांच्यावर घणाघाती प्रहार

मुंबई : “नरकातील स्वर्ग” हे पुस्तक प्रकाशित करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी ज्या शैलीत आत्मकथन मांडले, त्यावरून आता महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठले आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. शनिवारी एका पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना शिंदे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून “तारीख की तिथी” वाद पुन्हा पेटण्याची शक्यता

“मराठी तिथी म्हणजे अस्मिता, इंग्रजी तारीख म्हणजे केवळ Adjustment” – टी-शर्टवरील वादग्रस्त मजकुरावरून नवा वाद महाड: रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून व किल्ल्यावरील धनगर समाजाची घरे अनधिकृत ठरवून ती काढण्याच्या नोटिशी देण्याचा वाद सुरु असतानाच आता तारीख व तिथीवरून नवा वाद उत्पन्न होण्याची शक्यता आहे. ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा नव्या वादात सापडण्याची शक्यता निर्माण झाली […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नागपूरची महिला एलओसी ओलांडून पाकिस्तानात

नागपूर : नागपूरमधील एक महिला नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानात गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सुनीता जामगडे (वय 43) असे या महिलेचे नाव असून ती नागपूरच्या संत कबीरनगर परिसरात वास्तव्यास होती. यासंदर्भातील माहितीनुसार सुनीता जामगडे 14 मे रोजी आपल्या 12 वर्षीय मुलासह काश्मीरला गेली होती. त्यानंतर ती कारगील सीमेवरील शेवटचे गाव असलेल्या हुंदरमान येथे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नरकातील स्वर्ग’: संजय राऊत यांच्या पुस्तकाला टोलेबाजीच्या शैलीत शुभेच्छा

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार आणि सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या नव्या पुस्तकावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पुस्तकाच्या शीर्षकावरूनच अनेकांनी तिरकस प्रतिक्रिया दिल्या असून, काहींनी सोशल मीडियावर उपहासात्मक शुभेच्छा देत पुस्तकाची मजेशीर टीका केली आहे. गुरु आशिष पत्रावाला उर्फ अवधूत वाघ यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

सेल्युलर जेल परिसरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे स्मारक उभारण्याचा शासनाचा मानस

ॲड आशिष शेलार यांनी घेतली अंदमान निकोबारच्या मुख्य सचिवांची भेट पोर्ट ब्लेअर: सेल्युलर जेल परिसरात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे उचित स्मारक व्हावे असा महाराष्ट्र शासनाचा मानस असून त्यादृष्टीने राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज अंदमान निकोबार चे मुख्य सचिव डॉ चंद्र भूषण कुमार यांची भेट घेतली. राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

तरच मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल : हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर हल्लाबोल!

मुंबई – “जातीनिहाय जनगणना झाली, तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते,” असा ठाम दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. टिळक भवन येथे घेतलेल्या या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत, जातीनिहाय जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी केली. “जातीनिहाय जनगणना ही केवळ आकडेवारी नव्हे, तर सामाजिक न्यायाचा पाया […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नायर दंत रुग्णालय व दंत महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय दंत वैद्यकीय परिषदेकडून मान्यता बहाल मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित नायर दंत रुग्णालय आणि दंत वैद्यकीय महाविद्यालयात दैनंदिन वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, अधिकाधिक दर्जेदार सेवा देणे आगामी काळात शक्य होणार आहे. रुग्णालयात अधिक क्षमतेने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याकरिता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि भारतीय […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

देवनार डम्पिंगवरून तापले आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण…!

आदित्य ठाकरे व अ‍ॅड. आशिष शेलार यांच्यात थेट जुंपली मुंबई – मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई महापालिकेने तब्बल ₹२,३६८ कोटींची निविदा काढल्याने, राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचे वादळ उठले आहे. दोन दिवसांपूर्वी युवा सेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी या निविदेवर टीका करत, “ही जमीन अदानी समूहाच्या घशात […]