महाराष्ट्र ताज्या बातम्या

Nagpur : झिरो माईल’ होणार पर्यटकांचे आकर्षण केंद्र

मुंबई : नागपूर महानगराच्या समन्वित आणि चौफेर विकासासाठी आखलेली कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पांतर्गत परफॉर्मन्स गॅलरी, ‘झिरो माईल’ सौंदर्यीकरण, कॉटन मार्केट आणि फुल मार्केट विकास, तसेच कारागृह स्थलांतरण आदी योजनांना गती देण्याचे आदेश त्यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे नागपूर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या वित्तीय शिस्तीचं कौतुक; आर्थिक मागण्यांची सोळाव्या वित्त आयोगाकडे ठाम मांडणी

मुंबई : महाराष्ट्राच्या वित्तीय शिस्तीचे आणि देशाच्या आर्थिक विकासात राज्याच्या भरीव योगदानाचे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया यांनी कौतुक केले. सह्याद्री अतिथीगृह येथे सोळाव्या वित्त आयोगाची बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया, सदस्य डॉ. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यातील वक्फ मालमत्तांचे ‘जीआयएस मॅपिंग’ करा – आमदार रईस शेख यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : राज्यातील वक्फ मंडळाच्या मालमत्तांपैकी सुमारे ६० टक्के मालमत्तांवर अतिक्रमण झाल्याचा आरोप करत, या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते आणि भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. राज्यात सध्या २३,५६६ वक्फ मालमत्ता आणि सुमारे ३७,३३० हेक्टर जमीन वक्फच्या ताब्यात आहे. हैद्राबाद येथील […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे ‘महाराष्ट्र सायबर’च्या नाविन्यपूर्ण व नागरिक केंद्रित उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉट आणि सायबर जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या माहितीपटाचा समावेश होता. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “सायबर फसवणुकीसंदर्भातील फोन कॉल्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

इयत्ता 11 वीची जादा तुकड्या/ अतिरिक्त शाखा मंजुरी प्रक्रिया आता ऑनलाईन होणार

वेळ आणि पैशाचा अपव्यय टाळण्यासाठी संस्थांनी संगणकीय प्रणालीचा वापर करावा -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे मुंबई : इयत्ता 11 वी च्या जादा तुकड्या/ अतिरिक्त शाखा मंजूर करण्याबाबत दरवर्षी साधारणतः 250 ते 300 प्रस्ताव प्राप्त होतात. या प्रस्तावांचा प्रवास शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक व शासनस्तर असा होतो. प्रस्तावामध्ये त्रूटी आढळल्यास पुन्हा याच प्रकारे प्रस्ताव […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अपघातमुक्त सेवा देणाऱ्या एसटी चालकांचा रोख पारितोषिक देऊन सन्मान

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई: दरवर्षी अपघातमुक्त सेवा बजावणाऱ्या एसटी चालकांचा रोख रक्कम देऊन गौरव केला जाणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. बुधवारी झालेल्या एसटी महामंडळाच्या ३०७ व्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Operation Sindoor : CPI कडून स्वागत; दहशतवाद्यांच्या विरोधात भारतानं योग्य निर्णय घेतल्याचं मत

नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तान आणि POKमधील दहशतवादी ठिकाणांवर सुरू केलेल्या “ऑपरेशन सिंदूर”चं भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (CPI) स्वागत केलं आहे. CPIच्या राष्ट्रीय कार्यालयातून जाहीर करण्यात आलेल्या वक्तव्यात पक्षानं म्हटलंय की, या भीषण हल्ल्यात २५ भारतीय आणि एक नेपाळी नागरिक ठार झाले होते. अशा वेळी दहशतवाद्यांच्या मूळ केंद्रांवर थेट कारवाई करणं […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारतीय हवाई दलाची एअर स्ट्राईक; शरद पवार म्हणाले – जवानांचं मनापासून अभिनंदन

पुणे : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय हवाई दलानं मध्यरात्री दीडच्या सुमारास पीओकेमधल्या नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक केली. या कारवाईत कोणताही पाकिस्तानी नागरिक किंवा लष्कराचं ठिकाण लक्ष्य केलं नाही. फक्त दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्यात आले. या कारवाईबद्दल शरद पवारांनी भारतीय जवानांचं मनापासून अभिनंदन केलं आहे. शरद पवार म्हणाले, भारतीय सैन्यावर देशवासियांचा पूर्ण विश्वास […]

लेख ताज्या बातम्या

युद्ध वा युद्धजन्य परिस्थिती नकोच,पण युद्ध आणि युद्धच जगणाऱ्या देशाची ही कथा…

By: निलेश मदाने जगाच्या नकाशावर उभट टिकली सारखा दिसणारा एक ठिपका भूप्रदेशानं इतका छोटा हा देश. मागे शेकडो वर्षांच्या छळवणुकीचा इतिहास. दुसऱ्या महायुद्धात तर साठ लाख बांधवांचं शिरकाण छळछावण्यात झालेलं. रक्तपाताचं हे प्राक्तन नशिबी घेत 1948 साली हे राष्ट्र म्हणून जन्माला आलं खरं…पण नवजात अर्भकावर चारी दिशेनं हिंस्त्र श्वापदे धावून यावीत त्याप्रमाणे या देशाला जन्माप्रसंगीच […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भारताची अभिमानास्पद आर्थिक आघाडी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन मुंबई:- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालानुसार अमेरिका, चीन आणि जर्मनीनंतर सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या यादीत लवकरच भारत चौथ्या क्रमांकावर असेल. जपानला मागे टाकत भारत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनणार आहे. हा अहवाल जाहीर झाल्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र […]