X: @therajkaran
लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारांच्या (BJP Candidate) आतापर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, त्यात भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले
(Udayanraje Bhosale) यांचे नाव नसल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले होते. उदयनराजे नाराज असल्याची चर्चा होती. अशातचं आता उदयनराजे भोसलेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) मंगळवारी उशिरा रात्री भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दोन दिवसांपूर्वी उदयनराजे यांची भेट घेतली होती. उदयनराजे देखील नाराज असल्याची चर्चा होती. याचवेळी आता फडणवीस आणि उदयनराजे यांची भेट झाली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती समोर आली नसली तरीही सातारा लोकसभा (Satara Lok Sabha) मतदारसंघाच्या अनुषंगाने ही भेट झाल्याची माहिती मिळत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघामधून महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही. त्यातच भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत उदयनराजे यांचे नाव नसल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
संतापलेल्या उदयनराजे समर्थकांनी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना घेराव घालत जाब देखील विचारला होता. भाजपच्या पहिल्या यादीत उदयनराजे यांचे नाव नसने म्हणजेच हा छत्रपतींच्या गादीचा अवमान असल्याची भावना कार्यकर्त्यांनी बोलवून दाखवली आहे. अशात आता फडणवीस आणि उदयनराजे यांची भेट झाली आहे.