नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक केल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून ते तुरुंगात आहे. यावर निषेध व्यक्त करीत विरोधकांनी रविवारी ३१ मार्च रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानात शक्तिप्रदर्शन केलं. या जंगी सभेत राहुल गांधीसह सर्व नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं. काँग्रेसचे माजी पंतप्रधान राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर मॅचफिक्सिंगचा गंभीर आरोप केला. मोदींनी दिलेला ४०० पारचा नारा मॅचफिक्सिंग केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. लोकसभेची निवडणूक निष्पक्ष झाली तर भाजपसह एनडीएला १८० जागादेखील मिळणार नाही, अशा शब्दात राहुल गांधींनी भाजपवर कडाडून टीका केली.
यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीला केजरीवाल आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेनही उपस्थित होत्या. त्या दोघींना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधीही इंडियाच्या सभेत सामील झाल्या.
यावेळी उद्धव ठाकरेंसह शरद पवारही उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही निवडणुकीच्या प्रचारासाठी नव्हे तर संविधानाची रक्षा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. देशातील नागरिक सुनीता आणि कल्पना यांच्यासोबत आहेत. माझे देशबांधव घाबरणार नाहीत तर लढणार आहेत.
सभेच्या शेवटी इंडिया आघाडीच्यावतीने सहा आश्वासनांची आणि काँग्रेसकडून पाच मागण्यांचीही घोषणा करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत समान संधी द्यायला हवी. निवडणूक आयोगाने सक्तवसुली संचालनालय, केंद्रीय अन्वेषण विभाग आणि प्राप्तिकर विभाग आदींकडून विरोधी पक्षांविरोधात जबरदस्तीने होणाऱ्या कारवाया थांबवाव्यात. अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांची तत्काळ सुटका करावी, विरोधी पक्षांची आर्थिक गळचेपी बंद करावी. निवडणूक रोखे, खंडणी आणि आर्थिक अनियमिततांच्या आरोपांच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक तयार केले जावे.
सहा आश्वासने –
- देशात कुठेही विजेची कमतरता भासणार नाही. देशभरात गरिबांना वीज मोफत मिळेल.
- प्रत्येक खेड्यात सरकारी शाळा असेल.
- प्रत्येक गावात मोहल्ला क्लिनिक असतील.
- प्रत्येक जिल्ह्यात सरकारी मल्टीस्पशेलिस्ट रुग्णालये असतील. तेथे प्रत्येकाला मोफत उपचार मिळतील.
- शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव दिला जाईल.
- गेली ७५ दिल्लीकरांवर अन्याय झाला असून दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल.