नवी दिल्ली– लोकसभा निवडणुकांसाठी लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेत, 1 मार्च ते 13 एप्रिल या कालखंडात ठिकठिकाणी झालेल्या चेकिंगमध्ये 4658 कोटी रुपये जप्त करण्यात आलेत. यात रोख रक्कम, सोने-तांदी, दारु, ड्रग्ज आणि किमती सामानाचा समावेश आहे. गेल्या 75 वर्षांत जप्त करण्यात आलेली ही सर्वाधिक मोठी रक्कम आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 3475 कोटी रुपये जप्त केले होते.
निवडजणूक आयोगानं निवडणुका होण्यापूर्वी जानेवारी आणि फेब्रुवारी एकूण 7502 कोटी रुपये जप्त केले होते. जानेवारीपासून आत्तापर्यंत 12 हजार कोटी जप्त करण्यात आले आहेत.
प्रत्येक दिवशी 100 कोटी रुपये जप्त
1 मार्चनंतर झालेल्या कारवाीत आत्तापर्यंत 2068 कोटींचं ड्र्ग्ज, 1142 कोटींचं मोफत वाटण्यात येत असलेलं सामान, 489 कोटींची दारु आणि 395 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आलीय. रोख रकमेसह दररोज जप्त करण्यात येत असलेल्या सामानाची किंमत जवळपास 100 कोटी रुपये इतकी मोठी आहे.
तामिळनाडूत सर्वाधिक रोख रक्कम जप्त
तामिळनाडूत सर्वाधिक 53 कोटी, तेलंगणात 49 कोटी तर महाराष्ट्रात 40 कोटी जप्त करण्यात आलेत. कर्नाटक आणि राजस्थानात 35-25 कोटी जप्त करण्यात आलेत. कर्नाटकात सर्वाधिक 124 कोटींची दारु जप्त करण्यात आलीय. गुजरातमध्ये सर्वाधिक 485 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय.
हेही वाचाःबारामतीत नणंद विरूद्ध भावजय नव्हे तर बहीण Vs भाऊ अशी लढत? अजित पवारही अर्ज भरणार?