ताज्या बातम्या महाराष्ट्र

फडणवीसांनी एकनाथ शिंदेंसह अजित पवारांना पाडले उघडे: काँग्रेसची खोचक टीका

Twitter: @NalavadeAnant

 मुंबई

काँग्रेस आघाडी सरकारने कंत्राटी नोकर भरतीचा जीआर काढला होता त्यावेळी सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री पदावर होते. तसेच फडणवीस सरकार असताना व मविआ सरकारमध्येही सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मंत्री होतेच. फडणवीस यांनी शिंदे, पवार यांच्यावर कंत्राटी नोकर भरतीचे खापर फोडायचे आहे असे दिसते. शिंदे व पवार यांना फडणवीस यांनी उघडे पाडले याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे, असा खोचक टोला लगावात विरोध व राज्यभरातील लाखो तरुणांचा रेटा आणि कंत्राटी पद्धतीने करण्यात येणारी नोकर भरतीला विरोध यापुढे भाजपा सरकारला अखेर झुकावेच लागले, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

देवेंद्र फडणवीस हेच २०१४ ते २०१९ या काळात मुख्यमंत्री होते. मग त्यांनी काँग्रेस सरकारचा कंत्राटी नोकर भरतीचा जीआर त्याचवेळी रद्द का केला नाही? आताही शिंदे सरकार येऊन दीड वर्ष झाली. या दीड वर्षात हा जीआर रद्द का केला नाही? शिंदे सरकार सत्तेवर येताच महाविकास आघाडी सरकारच्या विकास कामांना तातडीने स्थगिती देऊ शकता तर कंत्राटी पद्धतीच्या नोकर भरतीचा जीआर रद्द करण्यास एवढा वेळ का लागावा? अशा रोखठोक प्रश्नांची सरबत्ती करत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याची उत्तरे फडणवीस यांनी द्यायली हवीत, अशी आग्रही मागणी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्यावर काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवला होता. सरकारी नोकरीची प्रतिक्षा करणाऱ्या तरुण वर्गातही याबाबत तीव्र संतापही होता. काँग्रेस पक्षाने नेहमीच तरुण वर्गाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत याप्रश्नी भाजपा सरकारला उघडेही पाडले होते. तरुण वर्गाची नाराजी परवडणारी नाही, निवडणुकीत दारुण पराभव होऊ शकतो हे लक्षात आल्यानेच भाजपाप्रणित सरकारवर कंत्राटी पद्धतीच्या नोकर भरतीचा जीआर रद्द करण्याची नामुष्की आल्याचा आरोपही पटोले यांनी केला.

फडणवीस यांच्याच गृह खात्याने काही दिवसांपूर्वी पोलिस विभागात कंत्राटी भरतीचा जीआर ठळकपणे काढला. त्यावेळी मूग गिळून गप्प बसण्याची सोईस्कर भूमिका त्यांनी घेतली हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले, अनुभवले. महा विकास आघाडीतील घटक पक्षांनीही याविरोधात आवाज उठवला. पण तरीही यांना जाग आली नाहीं आणि आता राज्यभर सुशिक्षित तरुणांच्या संतापाचा उद्रेक होईल ही शक्यता गृहीत धरून त्यांनी कंत्राटी जीआर रद्द करण्याची जी जाहीर भूमिका आज घेतली. पण ते करतानाही देवेंद्र फडणवीसांनी त्याचे खापर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर फोडले, असाही थेट आरोप पटोले यांनी केला.

यासंदर्भात भाजपा सरकार व देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेत  पटोले म्हणाले की, कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा निर्णय काँग्रेस सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला होता असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. पण ही नोकर भरती सरकारच करत होते व त्यांना नंतर सेवेत कायमही केले जात होते, याकडे लक्ष वेधत, सध्याची नोकरी भरती मात्र खाजगी कंपनीकडून केली जात होती. पण फडणवीस यांची अवस्था ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी झाली असून मी खरे कधी बोलत नाही आणि खोटे मला बोलता येत नाही ही फडणवीसांची कार्यपद्धती असल्याची टीकाही पटोले यांनी केली. 

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात