ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘हाफकिन वाचणार, मुंडेही राहणार’; विधानसभेत झिरवाळांची स्पष्ट घोषणा

Maharashtra Food and Drug Administration Minister Narhari Zirwal addressing the Legislative Assembly during a discussion on Haffkine Institute, food adulteration and FDA administration.

मुंबई : परळ येथील ऐतिहासिक हाफकिन इन्स्टिट्यूटची जागा विकली जाणार नाही, तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली होणार नाही, असे स्पष्ट आश्वासन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी बुधवारी विधानसभेत दिले.

काशीनाथ दाते यांच्यासह सुमारे ३० सदस्यांनी राज्याच्या आरोग्य सुरक्षेशी संबंधित ही महत्त्वाची लक्षवेधी सूचना मांडली होती.

चर्चेदरम्यान काशीनाथ दाते यांनी अहमदनगर जिल्ह्यातील भेसळ प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागात सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली करू नये, अशी मागणीही त्यांनी केली.

आमदार अर्जुन खोतकर यांनी भेसळ करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. बालकांमध्ये वाढणाऱ्या कर्करोगामागे भेसळयुक्त अन्नपदार्थ हेही एक कारण असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विभागातील रिक्त पदे कधी भरणार, अशी विचारणा केली.

उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, १ मे ते २१ जून २०२६ या कालावधीत ११ कोटी ९३ लाख रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला आहे. या काळात एकूण १,९३० नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.

झिरवाळ यांनी सांगितले की, विभागात १९७ पदे भरून कर्मचारी कार्यरत झाले आहेत, तर अंमली पदार्थविरोधी कारवाईसाठी आवश्यक निरीक्षकांची पदे पुढील एका महिन्यात भरली जातील.

विभागाच्या मनुष्यबळाच्या गरजांकडे लक्ष वेधताना ते म्हणाले की, अन्न व औषध प्रशासन विभागाला किमान १,१०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे, तर स्वतंत्र अंमली पदार्थविरोधी यंत्रणेसाठी ४४० कर्मचाऱ्यांची गरज आहे.

विभागाकडे वाहनांची कमतरता असल्याचे नमूद करत त्यांनी, “किमान भाडेतत्त्वावर तरी वाहने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे,” अशी मागणीही सभागृहात केली.

हाफकिन इन्स्टिट्यूटबाबत बोलताना झिरवाळ यांनी स्पष्ट केले की, संस्थेचे महत्त्व लक्षात घेता तिची जागा विकण्याचा कोणताही विचार शासनाच्या स्तरावर नाही.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

1 Comment

  1. Arlene Frieler

    June 24, 2026

    Excellent blog here! Also your website loads up fast! What web host are you the usage of? Can I am getting your associate link in your host? I want my website loaded up as fast as yours lol

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात