मुंबई : आगामी लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली असून रविवारी रात्री काँग्रेसनं ( Congress)10 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे . या निवडणुकीसाठी काँग्रेस दिल्लीतील (Delhi )तीन जागांवर पक्ष निवडणूक लढविणार असून तीन्ही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत . यामध्ये आक्रमक आणि दमदार वक्तृत्वशैलीतून विरोधकांची चिरफाड करणाऱ्या कन्हैया कुमारला ( kanhaiya kumar ) काँग्रेसनं ( Congress ) दिल्लीतील उत्तर-पूर्वमधून मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता विद्यमान खासदार मनोज तिवारी ( Manoj Tiwari ) यांच्याशी कन्हैयाची लढत होणार आहे.
दरम्यान काँग्रेसने उत्तर -पूर्वमधून कन्हैया कुमार, उत्तर पश्चिम उदित राज, चांदणी चौकातून जे. पी. अगरवाल यांना तिकीट देण्यात आले आहे. या दिल्लीतील तीन जागांशिवाय पंजाबमधील सहा जागांचीही घोषणा करण्यात आली आहे. पंजाबमध्ये अमृतसरमधून गुरजीत सिंग उजला, फतेहगड साहीबमधून अमर सिंग, भटिंडामधून मोहिंदर सिंग सिद्धू, संगरूरमधून सुखपाल सिंग खैरा आणि पटियाला मतदारसंघातून डॉ. धर्मवीर गांधी यांना तिकीट दिले आहे .याशिवाय उत्तरप्रदेशच्या अलाहाबाद मतदारसंघातून उज्ज्वल रेवती रमण सिंह यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान राजधानी असलेल्या दिल्लीत काँग्रेसनं कन्हैया कुमारला उमेदवारी दिलेल्या दोन वेळा भाजपा खासदार असलेल्या मनोज तिवारींच्या समोर तगडं आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे ईशान्य दिल्लीत बिहारी आणि यूपीमधील मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे दोन्ही बिहारी उमेदवारांना उमेदवारी दिल्यानं या मतदार संघात मोठा रंगतदार सामना होण्याची शक्यता आहे.
दरम्यान चंद्रपूर-वणी -आर्णी लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar)यांच्या प्रचारार्थ कन्हैया कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजित पवार, राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे . .’एक अकेला ‘ म्हणणारे मोदी यांची महाराष्ट्रात काय अवस्था झाली आहे? बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली. एकनाथ शिंदेना पुढे केले. शिंदे आल्याने काम बनलं नाही म्हणून शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फोडला. अजित पवारांना भाजपात घेतलं. त्यानंतर काँग्रेसच्या त्या नेत्यांना भाजपात घेतलं ज्यांचा पराभव झाला होता. मिलिंद देवरा, अशोक चव्हाण यांचं उदाहरणं ताजं आहे. एवढे दिग्गज नेते आल्यावर ही भाजपाचे समाधान झालं नाही. बिना पाणी पिता मोदी, अमित शहा यांच्यावर टीका करणारे राज ठाकरे यांना ही भाजपाने स्वतःकडे ओढलं, असं वक्तव्य कन्हैया कुमार यांनी केलं आहे.आता राजधानी दिल्लीत त्यांना उमेदवारी मिळाल्याने तेथे कोण बाजी मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .