मुंबई : आज पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघातील मतदानाला सुरूवात झाली आहे. आज लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक, भंडारा-गोंदिया या पाच मतदारसंघात मतदान पार पडत आहे. देशातील १०२ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. आज देशातील 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.
विदर्भात उन्हाचा तडाखा पाहता नागरिकांनी सकाळीच येऊन मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे. नागपूर – भाजप नेते नितीन गडकरी विरूद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे
रामटेक – एकनाथ शिंदे गटाचे राजू पारवे विरूद्ध काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विरूद्ध वंचितचे किशोर जयभिजे
भंडारा-गोंदीया – भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे विरूद्ध काँग्रेसचे प्रशांत पडोळे
गडचिरोली-चिमूर – भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते विरूद्ध काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान
चंद्रपूर – भाजपने सुनील मुनगंटीवार विरूद्ध काँग्रेसच्या प्रतीभा धानोरकर
नागपूर – भाजप नेते नितीन गडकरी विरूद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे
या राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान
उत्तर प्रदेशात – ८
राजस्थान – १३
मध्य प्रदेश – ६
आसाम – ५
बिहार – ४
महाराष्ट्र – ५
जम्मू काश्मीर – १
छत्तीसगड – १
मेघालय – २
अरूणाचल प्रदेश – २
त्रिपुरा – १
उत्तराखंड – ६
तामिळनाडू – ३९
पश्चिम बंगाल – ३
सिक्कीम – १
नागालँड – १
अंदमान आणि निकोबार – १
मिझोराम – १
पुडुचेरी – १
मणिपूर -१
लक्षद्वीप – १