मुंबई : लोकसभा निवडणूका अंतिम टप्यात आल्या असून निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केलं आहे . भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी( Nitin Gadkari) यांच्या पराभवासाठी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi), अमित शाह( Amit Shah)आणि देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) यांनी प्रयत्न केले आहेत ,असा खळबळजनक आरोप राऊतांनी केला आहे .त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे .
केंद्रीय मंत्री अमित शहां यांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे ‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’ हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. त्यामुळे भाजपला उत्तरप्रदेशात मोठा धक्का बसणार आहे .त्याठिकाणी भाजपला ३० जागांचा फटका बसणार आहे .. आधी मोदी-शहांना घालवा असे उत्तरेतील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवले. त्याचाही परिणाम ४ जूनला दिसेल.असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे . येत्या ४ जूननंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची राजवट याबाबत शंकांचं नाही . या लोकसभा निवडणुकीत या दोघांना सत्तेवरून दूर करण्यासाठीच देशातील जनतेने मतदान केले आहे , असेही राऊत म्हणाले आहेत .
या लोकसभा निवडणुकीत ज्यांनी आतापर्यंत मोदींना मतदान केले तो शेतकरी, कष्टकरीच मोदींच्या विरोधात उभा ठाकला. मोदी यांनी देशावर रशियाच्या पुतीनप्रमाणे राज्य केले.त्यांनी देशात लोकशाहीलाच बंदिवान केलं आहे त्यामुळे त्यांचा पराभव होऊ शकत नाही असा भ्रम सगळीकडे पसरवला आहे . मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीचा महायुतीला जोरदार फटका बसणार आहे . या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या विरोधात फडणवीस यांनीच कट रचले हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात असे राऊत म्हणाले .