मुंबई- गुढपीढव्याच्या सभेत महाययुतीला जाहीर पाठिंबा जाहीर केल्यानंतर पक्षात आणि बाहेर उसळलेल्या वादळानंतर राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शनिवारी मनसेचे नेते, सरचिटणीस, विभाग प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करुन राज यांनी निर्णय घेण्यामागची भूमिका स्पष्ट केलीय. या लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवार का उभी करणार नाही, यावरही त्यांनी सभेत याबाबतची भूमिका स्पष्ट केल्याचं सांगितलंय.
प्रचारात सहभागी होणार का?
महायुतीच्या प्रचारात मनसे सहभागी होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. याबाबत पदाधिकाऱ्यांनी विचारणा केल्यानंतर राज यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. महायुतीचा उमेदवार किंवा इतर पक्षांतील प्रमुख नेत्यांनी आदरानं बोलावलं तरच प्रचाराला जा, असं त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना सांगितलंय. राज्यात महायुतीत असलेल्या पक्षांनी प्रचारासाठी कुणाशी संपर्क करायचाय हे लवकरच जाहीर करण्यात येईल, असंही राज ठाकरेंनी सांगितलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे काय मागण्या?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मनसेच्या काय मागण्या आहेत हेही स्पष्ट करण्यात आलंय.
- मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या
- गड किल्ल्यांचं संवर्धन करा
- उत्तम शिक्षण आणि रोजगाराच्या संधी
- सर्व राज्यांना एकसमान वागणूक
या महत्त्वाच्या मागण्या मोदी यांच्याकडे असल्याचं राज यांनी स्पष्ट केलेलं आहे.
17 मे रोजी पंतप्रधान-राज यांची एकत्र सभा?
मुंबई आणि ठाण्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. त्यापूर्वी 17 मे रोजी मनसेच्या वतीनं शिवाजी पार्वक सभेची परावनगी घेण्यात आलेली आहे. ही सभा मुंबई, ठाण्यासाठी महत्त्वाची असणार आहे. ही सभा महायुतीची अखेरची मोठी सभा असेल असं सांगण्यात येतंय. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर राज ठाकरे दिसण्याची शक्यता आहे.
हेही वाचाःमहाराष्ट्रातील मतदारांसाठी सर्वात मोठा मुद्दा कोणता, सर्वेक्षणात काय आलंय समोर?