मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाविकास आघाडीने ( mhavikas aaghadi )जोरदार मुसंडी मारली असल्याने राज्यात 45 पेक्षा जास्त जागा मिळवण्याची भाषा करणाऱ्या भाजपप्रणित महायुतीला( mhayuti )मोठा फटका बसला आहे. निकालाच्या दुसऱ्यादिवशी महाराष्ट्र भाजपाची मुंबईत बैठक पार पडली. यात महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी आपल्यावर घेत त्यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दाखवली आहे . त्याच पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. तिथे फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी( PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह( Amit Shah), अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda ) यांच्याशी चर्चा करून सरकारमधून बाहेर पडत पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करणार आहेत . त्यांची मागणी पक्षश्रेष्ठींकडून मान्य होईल का ? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे .
कालपासून देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार केल्याची चर्चांना रंगली होती. या पार्शवभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule )यांनी फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर जावून त्यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. या चर्चेनंतर बावनकुळे ‘सागर’ बंगल्याबाहेर आले तेव्हा त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले , आमच्यात दुसरी कुठलीही चर्चा झाली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यासमोर त्यांच्या भावना मांडल्या. त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली. ते केंद्राशी बोलतील. मला वाटतं असा कुठलाही निर्णय होणार नाही. त्यांच्या भावना आहेत त्या ते मांडतील. मला वाटतं, आमचं केंद्राचं नेतृत्वदेखील या गोष्टीला मान्यता देणार नाही”, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पराभवाची जबाबदारी सर्व घटक पक्षांची असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान त्यांच्या राजीनाम्यावर बोलताना दिल्लीतील एका नेत्यानं सर्व चर्चा फेटाळल्या आहेत. “पक्षश्रेष्ठींकडून फडणवीसांना पद सोडण्याचा कोणताही आदेश आला नाही. त्यांनी स्वत:हून ती भूमिका घेतली आहे. मात्र, ती मान्य केली जाण्याची शक्यता नाही,” असं भाजप नेत्यांनी सांगितलं आहे .