ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आकड्यांवरुन जुंपली, इंडिया आघाडीला देशात 305 जागा, भाजपाला एकूण 45 जागा, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची वक्तव्य..आशिष शेलारांनी दिलंय काय आव्हान?

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपानं देशात 400 पारचा नारा दिलेला असताना, ठाकरेंच्या शिवसेनेकडून मात्र याची खिल्ली उडवण्यात येतेय. 400 पेक्षा जास्त खासदार काय चंद्राहून आणणार का, असा सवाल आदित्य ठाकरे जाहीर सभांमधून करतायेत. तर मंगळवारच्या पत्रकार परिषदेत मविआ महाराष्ट्रात 48 जागा जिंकेल असं सांगतानाच, देशात भाजपाला 45 जागा मिळतील असा दावा केलाय. यातच भर […]

ताज्या बातम्या मुंबई

400 पारचा आकडा गाठण्यासाठी चंद्रावरुन खासदार आणणार का?, आदित्य ठाकरेंचा भाजपाला सवाल

मुंबई- २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं उद्धव ठाकरे यांची फसवणूक केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय. गोरोगावात आयोजित युवा स्वाभिमान मेळाव्यात ते बोलत होते. भाजपा ही भारतीय जनता पार्टी नसून भारतीय जुमला पार्टी असल्याची टीकाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केलीय. चंद्रावरुन खासदार आणणार का- आदित्य देशात ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचा संकल्प […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“तुम लढो हम कपडा सांभालते है”ठाकरेंची भूमिका ; उमेदवारी मिळताच श्रीकांत शिंदेचा वार

मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde)यांना उमेदवारी जाहीर झाली आहे . उमेदवारी जाहीर होताच त्यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या मतदारसंघात झालेला विकास पाहून ठाकरेंची लढण्याची हिंमत झाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्याला पुढे करून “तुम लढो हम कपडा सांभालते है” […]

ताज्या बातम्या जिल्हे महाराष्ट्र मुंबई

विदर्भात आता आदित्य ठाकरे मैदानात, यवतमाळमधून महायुतीला देणार आव्हान

नागपूर – विदर्भात रणरणत्या उन्हात प्रचारही तापलेला आहे. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांचे अर्ज भरुन झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा आणि अर्ज भरण्याची लगबग सुरु झालीय. यातच ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचं बळ वाढवण्यासाठी आदित्य ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर दाखल झालेले आहेत. यवतमाळमध्ये आदित्य ठाकरेंची प्रचार सभा यवतमाळ वाशिम मतदारसंघात पाच टर्म असलेल्या खासदार भावना गवळी यांना पुन्हा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाकरेची तोफ धडाडणार ; उद्धव ठाकरें , आदित्य ठाकरेंच्यासह ४० जणांचा प्रचार यादीत समावेश

मुंबई : शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लोकसभेसाठी जोरदार कंबर कसली असून याआधी त्यांनी 17 उमेदवारांची यादी जाहीर केली होती .त्यानंतर आज शिवसेना स्टार प्रचारकांची( star campaigners List of Thackeray group )यादीही जाहीर करण्यात आली आहे. त्यात 40 जणांचा समावेश आहे.. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे ( Aditya […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, कोणत्या नेत्यांना संधी?

मंबई- लोकसभा निवडणुकांत अस्तित्व पणाला लागलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्र्चारकांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. पहिल्याच्या टप्प्यायतील उमेदवारांचे अर्ज भरुन झाल्यानंतर आता राज्यात प्रचार सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. महायुतीसमोर प्रचार करताना ठाकरेंची सेना आणि मविा नेत्यांचा कस लागणार आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात ऐन उन्हाळ्यात प्रवास करुन प्रत्येक पक्षाला प्रचार करावा लागणार आहे. प्रचार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

Coastal Road: उद्धव ठाकरेंनी भूमिपूजनाही बोलावलं नाही, आदित्य ठाकरेंना कोस्टल रोडच्या श्रेयवादावरुन फडणवीसांनी फटकारलं

मुंबई– आम्ही दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेणारे नाही आहोत, असा टोला उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना देवेंद्र फडणवीसांनी लगावला. कोस्टल रोडची संकल्पना नवी नव्हती. अनेक वर्ष संकल्पना होती. उद्धव ठाकरेंनी दोन महापालिका निवडणुका कोस्टल रोडचं प्रेझेंटेशनचं दाखवून पार पाडल्या. कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यातीाल एका मार्गिकेचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

तर आम्ही राजकीय संन्यास घेऊ – राहुल कनाल

X : @NalavadeAnant मी बाळासाहेब भवन मध्ये स्व. बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की,कोविड काळातील कुठल्याही घोटाळ्यात आढळले,मग तो रेमिडिसवेअर चा घोटाळा असो,बॉडी बॅग घोटाळा असो किंवा खिचडी घोटाळा असो,यातील कुठल्याही घोटाळ्यात जर माझे किंवा अमेय घोले यांचे नाव आढळले तर आम्ही आमच्या राजकीय कारकिर्दीचा राजीनामा देऊ. अन्यथा तुम्ही तुमच्या राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा द्याल का.? असे […]

मुंबई

उद्धव सेनेच्या मुंबईतील राजकीय ताकदीपुढे भाजपची शरणागती: सिनेट निवडणूक पुढे ढकलली

Twitter : @vivekbhavsar मुंबई : शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केल्यानंतर देखील मुंबईत शिवसेनेचा पराभव करणे शक्य नाही, याची जाणीव झालेल्या भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याचे धाडस केलेले नाही. आता तर त्यांनी मुंबई विद्यापीठावरील युवा सेनेचे वर्चस्व मोडीत काढणे अशक्य असल्याचे लक्षात येताच सिनेट पदासाठी सुरू झालेली […]