ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

एकनाथ शिंदेंचं राजकीय अस्तित्व धोक्यात? अमित शाहांकडून राज ठाकरेंना मोठा प्रस्ताव

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं राजकीय करिअर धोक्यात असल्याची चिन्हं आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचं विलिनीकरण करीत पक्षाची धुरा तुमच्या हातात घ्या, असा महत्त्वाचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. प्रस्तावामुळे एकनाथ शिंदे यांचं राजकीय करिअर धोक्यात सापडले असंही या वृत्तात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाची तिकीटं पाठवली थेट सोनिया आणि राहुल गांधींना? कुणी केलाय हा प्रताप?

मुंबई – लोकसभेच्या तोंडावर रणदीप हुडा आणि अंकिता लोखडे यांची प्रमूख भूमिका असलेला स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. हिंदी आणि मराठीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांना पहिल्या दिवशी महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. ,स्वातंत्र्यवीर सावरकरांवर माफीवीर अशी टीका करणाऱ्या काँग्रेसला डिवचण्याची संधी या निमित्तानं भाजपानं घेतलेली आहे. उजव्या विचारसरणीच्या अनेकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा थिएटरमध्ये जाऊन […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

बारामतीतला संघर्ष आणखी तीव्र, शिवतारेही रिंगणात, थोपटेंनंतर आता पवारांचा आणखी एक विरोधक गळाला?

बारामती- बारामती लोकसभा मतदारसंघातला संघर्ष तिहेरी होताना पाहायला मिळतोय. शरद पवार विरुद्ध अजित पवार या संघर्षात शिंदेंच्या शिवसेनेचे विजय शिवतारे हेही या मैदानात उतरलेले आहेत. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी बारामतीत लढत होणार हे स्पष्ट झाल्यानंतर पवार कुटुंबीयांकडून प्रचाराला सुरुवात झाली होती. मात्र त्यात शिवतारेंच्या एन्ट्रीमुळं ही लढत तिरंगी होणार असल्याचं स्पष्ट झालंय. शिवतारे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Sambhajinagar Lok Sabha : मराठवाड्यात शिंदेच्या शिवसेनेला डच्चू देत एकच जागा : संभाजीनगरची जागा भाजपकडेच

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असताना देखील छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) जागेवर अजूनही ठोस तोडगा निघू शकलेला नाही. दरम्यान, मराठवाड्यात मोठी ताकद असूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (Eknath Shinde Shiv Sena) फक्त एकच जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच अनेक दशकांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या संभाजीनगरची जागादेखील भाजपकडेच (BJP) राहण्याची शक्यता आहे.  लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘लोकसभा निवडणूक लढवायची नव्हती, आशीर्वादाचं काय?’ उमेदवारीनंतरही पंकजा मुंडेंची अस्वस्थता कायम?

बीड – बीडची भाजपाची उमेदवारी पंकजा मुंडे यांना जाहीर झाल्यानंतर त्यांचा राजकीय वनवास संपला, असं मानण्यात येत होतं. मात्र पंकजा मुंडे यांनी प्रचाराला सुरुवात केल्यानंतर पहिल्याच दिवशी केलेल्या वक्तव्यांनी पंकजा मुंडेंची अस्वस्थता अद्यापही कायम आहे की काय, असा सवाल निर्माण झालाय. पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुणे, नगर, पाथर्डी यामार्गे शक्तिप्रदर्शन करत पंकजा मुंडे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महायुतीत 9 जागांवर अद्यापही तिढा, रामटेक, अमरावती कुणाकडे?, भाजपा प्रदेशाध्यक्षांनी काय सांगितलं?

मुंबई- महायुतीत अद्यापही नऊ जागांवर तिढा असल्याची कबुली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय. भाजपाच्या केंद््रीय निवडणूक समितीची बैठक आज दिल्लीत होते आहे. त्या बैठकीत या विषयावर चर्चा होईल आणि हा तिढा लवकर संपेल, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे. महायुतीत कोणत्या जागांवर तिढा? या नऊ जागांवर महायुतीत पेच असल्याचं सांगण्यात येतंय. अमरावती भाजपा लढवणार […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईतील महायुती आणि मविआचं जागावाटप कसं होणार? कोणत्या जागांवर उमेदवारांचा शोध?, कोणत्या जागांवर तिढा

मुंबई- लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन आठवडा उलटून गेला, तरी महायुतीकडून मुंबईतील केवळ दोन उमेदवारांचं नाव जाहीर झालंय. तर मविआकडून मुंबईतील एकाही उमेदवाराचं नाव जाहीर झालेलं नाही. मुंबईतील सहा जागांवर दोन्ही बाजूंनी तिढा असल्याचं दिसतंय. मनसे महायुतीत येण्याच्या चर्चेनं या तिढ्यात आणखी भर पडलीय. सहा मतदारसंघात काय स्थिती? देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत महायुती आणि मविआचं […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

महाविकास आघाडीचं 44 जागांचं जागावाटप पूर्ण, या चार जागांवर तिढा कायम

मुंबई- महाविकास आघाडीचं 48 पैकी 44 जागांचं वाटप पूर्ण झाल्याची माहिती आहे. यात आता वंचितचा समावेश मविआत नसेल हे स्पष्ट झालेलं आहे. उर्वरित चार जागांचा निर्णय लवकरच होईल असं सांगण्यात येतंय. या चार जागांत सांगली, भिवंडी आणि मुंबईतील दोन मतदारसंघांचा समावेश आहे. या चार जागांवर तिढा सुटला नाही तर या चारही मतदारसंघात बंडखोरी किंवा मैत्रीपूर्ण […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मनसेला उमेदवारी दिल्यास भाजपला देशभर विरोध

उत्तरभारतीय विकाससेनेचा इशारा X: @ajaaysaroj मुंबई: राज ठाकरे यांची मनसे, भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी महायुतीमध्ये येण्याची केवळ औपचारिकताच आता शिल्लक राहिली आहे. मात्र त्याआधीच उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित सुनील शुक्ला यांनी, मनसेला भाजपने युतीमध्ये घेतल्यास मुंबईतील सर्व लोकसभा जागांवर उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार , […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Vijay Shivtare: कमळ चिन्हावर लढेन पण बारामतीतूनच लढेन; विजय शिवतारेंनी दिलं अजितदादांना टेन्शन

X: @therajkaran लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु झाली असताना शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी आज पुन्हा एकदा बारामतीतून (Baramati) लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतल्यानंतर विजय शिवतारे यांनी हा निर्धार व्यक्त केला आहे. मात्र, वेळ पडल्यास आपण कमळ चिन्हावरही लढू असंही शिवतारे यांनी म्हटलं […]