लोकसभा निवडणुकीत उमेदवाराला खर्चाची किती मर्यादा? कार्यकर्त्यांच्या खाण्या-पिण्यावर किती खर्चाची परवानगी?
मुंबई – लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे. जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्यात. काही जणांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. आता काही भागात प्रचारसही सुरु झालेला आहे. अशात निवडणुकीसाठी आणि प्रचारासाठी होणाऱ्या खर्चाची चर्चा रंगू लागलेली आहे. या लोकसभा निवडणुकीत गेल्या काही निवडणुकांपेक्षा जास्त खर्च केला जाईल असंही छातीठोकपणे सांगण्यात येतंय. राज्यात बदललेली राजकीय समीकरणं, महायुती विरुद्ध मविआ […]