Petrol station in Maharashtra with fuel pumps, government order documents and fuel tankers symbolizing new restrictions on diesel sales and anti-hoarding measures introduced by the state government. महाराष्ट्र ताज्या बातम्या

युद्धाची चाहूल की सरकारची खबरदारी?

जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल विक्रीवर निर्बंध; २०० लिटरची मर्यादा लागू मुंबई — जागतिक भू-राजकीय घडामोडींमुळे ऊर्जा पुरवठा साखळीवर निर्माण झालेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने पेट्रोलियम पदार्थांच्या खरेदी-विक्रीवर काही महत्त्वाचे निर्बंध लागू केले आहेत. शुक्रवार, १२ जून रोजी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशानुसार, एका ग्राहकाला किंवा वाहनाला दिवसाला २०० लिटरपेक्षा जास्त डिझेल विक्री करता येणार नाही. […]

लाखो शिवभक्त ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड किल्ल्याकडे जाताना; भगवे ध्वज आणि उत्साहपूर्ण वातावरण. महाराष्ट्र ताज्या बातम्या

३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त रायगडावर दाखल; जयघोषाने दुमदुमला गड

देश-विदेशातून शिवप्रेमींची रायगडावर गर्दी; संभाजीराजे आणि शहाजीराजे यांच्या उपस्थितीत आज ऐतिहासिक सोहळाBy Milind Mane महाड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर लाखो शिवभक्तांनी गर्दी केली असून संपूर्ण गड परिसर शिवमय झाला आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय लोकोत्सवाला राज्यासह देश-विदेशातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहत […]

डॉ. आनंदीबाई जोशी स्मारकाचे भूमिपूजनानंतर उभारण्यात येणाऱ्या स्मारकाची संकल्पना दर्शवणारी सजवलेली प्रतिकृती, कल्याण मुंबई ताज्या बातम्या

कल्याणात देशातील पहिल्या महिला डॉक्टरांच्या स्मारकाला मुहूर्त; ₹15 कोटी निधी मंजूर  

कल्याण: कल्याण शहरासाठी कालचा दिवस अभिमानाचा आणि सुवर्णाक्षरांनी नोंदवण्याजोगा ठरला. देशातील पहिल्या महिला डॉक्टर डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याने कल्याणकरांच्या दीर्घकाळच्या मागणीला अखेर मूर्त रूप मिळाले. हा केवळ भूमिपूजन सोहळा नव्हता, तर महिलांच्या शिक्षण, संघर्ष आणि यशाच्या इतिहासाला दिलेला सार्वजनिक मान होता. कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संरक्षिका गीताताई […]

Fattesinh Sawant speaking at a public event, appealing to youth to protect Raigad Fort and preserve historical heritage महाराष्ट्र ताज्या बातम्या

रायगडावर प्री-वेडिंग शूट कसे झाले? प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न  

महाड : सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला रायगड किल्ला हा केवळ ऐतिहासिक वास्तू नसून हिंदवी स्वराज्याच्या अभिमानाचा जिवंत साक्षीदार आहे. अशा पवित्र स्थळी अलीकडेच झालेल्या प्री-वेडिंग शूटच्या घटनेने शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असून, “गड-किल्ले जपा, इतिहास जपा — हाच खरा शिवभक्तीचा मार्ग”, असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी केले. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सावंत म्हणाले […]

Donkeys used for carrying construction material on Raigad Fort standing exhausted near roadside in Mahad महाराष्ट्र ताज्या बातम्या

रायगडच्या विकासाच्या नावाखाली क्रूरता; गाढवांचे मृतदेह कोंझर घाटात फेकले

महाड: किल्ले रायगडावरील विकास कामांच्या नावाखाली मुक्या प्राण्यांवर होत असलेल्या अमानुष अत्याचाराचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गडावर बांधकाम साहित्य वाहून नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गाढवांचे हाल होत असून, मृत झालेल्या गाढवांना कोंझर घाटात उघड्यावर फेकून दिल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. महाड–रायगड मार्गावरील जुन्या कोंझर घाटात चार ते सहा गाढवांचे मृतदेह रस्त्यालगतच्या दरीत टाकून दिल्याने […]

Portrait of Shabbir Ansari, veteran Muslim OBC leader and social activist from Maharashtra महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुस्लिम ओबीसी चळवळीचे प्रणेते शब्बीर अन्सारी यांचे निधन; महाराष्ट्रात शोककळा

मुंबई — मुस्लिम ओबीसी चळवळीचे प्रणेते, लोहियावादी विचारांचे कट्टर अनुयायी आणि फुले-शाहू-आंबेडकर विचारांचा वारसा मुस्लिम समाजात नेणारे ज्येष्ठ नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील ओबीसी आणि विशेषतः पस्मांदा मुस्लिम चळवळीवर मोठा आघात झाला आहे. ज्येष्ठ नेते कपिल पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना सांगितले की, “मुस्लिम ओबीसींचा एक खरा योद्धा आज आपल्यातून […]

Busy Indian commercial kitchen with chefs working on gas burners and LPG cylinders, representing increased LPG supply for hotels and restaurants in Maharashtra महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यातील हॉटेल-उपहारगृहांना दिलासा: २०% अतिरिक्त LPG पुरवठा, छगन भुजबळांची घोषणा

मुंबई — राज्यातील हॉटेल, ढाबे, उपहारगृहे तसेच औद्योगिक कॅन्टीन आणि अन्न प्रक्रिया व दुग्धव्यवसाय क्षेत्रासाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार २० टक्के अतिरिक्त व्यापारी एलपीजी (Commercial LPG) पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने २१ मार्च […]

Farmers in Marathwada standing in rain-damaged fields after unseasonal rain and hailstorm affecting crops महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठवाड्यात 11 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत

मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून, सुमारे ११ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील फळपीके बाधित झाल्याची नोंद शासन स्तरावर करण्यात आली आहे. पुढील चार दिवसही पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. अलीकडील गारपीट आणि वादळी पावसामुळे हाताला आलेली पिके आडवी झाली असून, शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करण्याची […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Loan Waiver: कर्जमाफीचे संकेत : मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत (Loan waiver to farmers) सकारात्मक संकेत मिळत असल्याने मराठवाड्यातील (Marathwada) शेतकरी वर्गात आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्जमाफीचा निर्णय झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होणार असल्याचे चित्र आहे. कारण मागील महिन्यातच मराठवाड्यात ७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या (76 farmers committed suicide in Marathwada) केल्याची नोंद शासन दप्तरी आहे. कर्जबाजारीपणामुळे मराठवाड्यातील अनेक शेतकरी आर्थिक […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

एका दिवसात १५ महसूल सेवा निकाली काढणार; शिवजयंतीच्या पर्वावर महसूल मंत्र्यांची महत्त्वाकांक्षी घोषणा

मुंबई: शिवजयंतीच्या महापर्वावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ जाहीर केले. हे अभियान राज्यातील सर्व महसूल मंडल तसेच नगरपालिका व नगरपंचायतींच्या क्षेत्रात पुढील दोन महिन्यांत एकूण सहा दिवस राबविले जाणार असून, पूर्वतयारीला शिवजयंतीपासून प्रारंभ होत आहे. या अभियानाची राज्यस्तरीय अंमलबजावणी महसूल मंत्र्यांच्या थेट देखरेखीखाली दररोज होणार आहे. यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली […]