ताज्या बातम्या महाराष्ट्र

महायुतीचा तिढा सुटला ; नाशिकच्या लोकसभेतून छगन भुजबळांची माघार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha) जागेवरून तिढा निर्माण झाला होता . या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी दावा ठोकला होता . मात्र निवडणूक जवळ येत असूनही तिढा सुटत नाही हे पाहून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी स्वतःहून आपण […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘संकटमोचक गिरीश महाजन हे देव नाहीत’, ठाकरेंच्या शिवसेनेचे उन्मेष पाटील कडाडले

जळगाव- जळगाव लोकसभा मतदारसंघात प्रचार रंगण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाच्या स्मिता वाघ यांना ठाकरेंच्या शिवसेनेतून करण पवार यांनी आव्हान दिलं आहे. भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत, करण पवार यांना उमेदवारी दिलीय. आता उन्मेष पाटील विरुद्ध गिरीश महाजन असा वाद मतदारसंघात प्रचारादरम्यान दिसतोय. गिरीश महाजनांच्या टीकेला प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांचे नीकटवर्तीय असलेल्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज्यात निवडणूक काळात आत्तापर्यंत 7 कोटी 90 लाखांची दारु जप्त, ओल्या पार्ट्यांवर कारवाई, 4 हाजारांच्यावर गुन्हे दाखल

मुंबई- लोकसभा निवडणुका असो वा ग्रामपंचायत निवडणुका मतदारांना निरनिराळ्या प्दधतीनं आमिष, प्रलोभनं दाखवण्याचे प्रकार नेहमीच सर्रास सुरु असतात. या काळात सर्वाधिक वाटण्यात येतो तो पैसा आणि दारु. निवडणूक आयोगानं या लोकसभा निवडणुकीच्या काळात आारसंहिता लागू झाल्यापासून कठोर उपाययोजना केलेल्या दिसतायेत. ठिकठिकाणी पोलिसांची नाकेबंदी करण्यात आली असून, गाड्यांची झडती घेण्यात येतेय. निवडणुकांमध्ये वाहणारा दारुचा पूर रोखण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

पहिल्या टप्प्यातील 102 जागांपैकी किती जागा एनडीए आणि इंडिया आघाडीला ? महाराष्ट्रात पाच पैकी कुणाला किती?

नवी दिल्ली- निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सकाळपासून सुरुवात झालेली आहे. विदर्भात तापमान ३५ ते ४० अंश सेल्सिअस असल्यानं मतदानाचा जोर सकाळच्या सत्रात कमी असल्याचं पाहायला मिळालंय. हाच ट्रेंड दिवसभर राहिला तर मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. दरम्यान देशात 102 जागांसाठी आज मतदान होत असून, या जागांच्या निकालांवर पुढची दिशा स्पष्ट होईल, असं मानण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सांगली द्या, उत्तर मुंबई मतदारसंघ घ्या, काँग्रेसची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर, उद्धव ठाकरेंच्या निर्णयाकडं लक्ष

मुंबई- महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा मात्र अद्यापही कायम आहे. आता सांगली मतदारसंघ काँग्रेसला द्यावा आणि त्याऐवजी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेनं घ्यावा, असा प्रस्ताव आता देण्यात आल्याची चर्चा आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी हा प्रस्ताव उद्धव ठाकरेंना दिल्याचं सांगण्यात येतंय. ठाकरेंच्या शिवसेनेनं सांगली मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडं सांगली मतदारसंघ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार ठरला, भाजपाच्या मंगलप्रभात लोढांना तिकीट?

मुंबई – पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरु झालं असलं तरी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहेत. त्यात दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघांचा समावेश आहे. दक्षिण मुंबईच्या जागेवरुन तर ठाकरेंची शिवसेना आणि भाजपात प्रचंड चुरस आहे. अशात दक्षिण मुंबईतील महायुतीचा उमेदवार ठरला असल्याचं सांगण्यात येतंय. दक्षिण मुंबईची जागा भाजपा लढणार असून, मंगलप्रभात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

पूर्व विदर्भात मतदान असताना वर्ध्यात मोदींची सभा कशी? विरोधक आक्रमक

नागपूर : आज महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. नागपुरापासून साधारण ८० किलोमीटरवर दुसऱ्या टप्प्यात निवडणूक असलेल्या वर्धा लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुपारी चार वाजता प्रचार सभा पार पडणार आहे. मात्र पूर्व विदर्भात मतदान सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेविषयी सवाल उपस्थित केला जात आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार मतदानाच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

19 राज्ये आणि 102 मतदारसंघ; आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरूवात

मुंबई : आज पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघातील मतदानाला सुरूवात झाली आहे. आज लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक, भंडारा-गोंदिया या पाच मतदारसंघात मतदान पार पडत आहे. देशातील १०२ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. आज देशातील 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नारायण राणेंसाठी पूर्ण ताकदीने काम करु – उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही

X : @NalavadeAnant मुंबई: तिकिट वाटपावर चर्चा सुरु असताना महायुतीत तेढ निर्माण होऊ नये म्हणून किरण सामंत यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी गुरुवारी येथे एका पत्रकार परिषदेत केली. भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी जाहीर झाल्यास पूर्ण ताकदीने काम करु,अशी ग्वाहीही सामंत यांनी सकाळी दिली. सामंत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अखेर नारायण राणेच ठरले महायुतीचे उमेदवार

प्रकल्प पूर्ण करू शकणारा लोकप्रतिनिधी ठरली जमेची बाजू X: @ajaaysaroj मुंबई: बहुचर्चित, बहुप्रतिक्षित आणि अत्यंत हाय व्होल्टेज ड्रामा अपेक्षित असलेल्या सिंधुदुर्ग – रत्नागिरी मतदारसंघातून (Sindhudurg – Ratnagiri Lok Sabha)अखेर महायुतीचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे (BJP candidate Narayan Rane) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील (Mahavika Aghadi) शिवसेना उबाठा गटाच्या विनायक राऊत […]