जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मोदींची हवा नाही, वादग्रस्त वक्तव्यानं नवनीत राणा अडचणीत, राणा दाम्पत्य थेट अडसुळांच्या घरी

अमरावती- जात प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टानं वैध ठरवल्यानं उमेदवारीचा मार्ग मोकळा झालेल्या नवनीत राणा पुन्हा चर्चेत आल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापूर्वीच त्यांना भाजपानं तिकीट जाहीर केलं आणि त्यांनी पक्षप्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी राणा यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला. सुप्रीम कोर्टातही जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा लढा त्यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

एकनाथ खडसे यांना दाऊद आणि छोटा शकील गँगकडून धमकीचे फोन, काय आहे कारण?

जळगाव – भाजपात घरवापसी करण्याच्या तयारीत असलेले शरद पवार राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना अमेरिकेतून चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन धमकीचे फोन आले आहेत. या प्रकरणी खडसे यांच्या वतीनं मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालण्याची विनंती एकनाथ खडसे यांनी केली आहे. दाऊद आणि छोटा शकील गँगकडून हे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अंतिम निर्णय १९ तारखेला होईल ; शरद पवारांच्या भेटीनंतर जानकरांचा माढ्यातील सस्पेंस

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी बहुतांश मतदारसंघात लढती निश्चित झाल्या आहेत. काही ठिकाणी इच्छुक उमेदवारांना संधी न मिळाल्याने बंडाची तयारी केली आहे. दरम्यान, माळशिरसमधील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली . या भेटीनंतर त्यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पहिल्या टप्प्यात राज्यातल्या कोणत्या पाच मतदारसंघांमध्ये मतदान?, कोण आहेत आमनेसामने?

नागपूर- होणार होणार, अशी चर्चा आणि अत्सुकता असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे. गेल्या १० ते १५ दिवसांपासून रणरणत्या उन्हात सुरु असलेला पहिला टप्प्यातील प्रचार आज संध्याकाळी संपतोय. पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. कोणत्या पाच लोकसभा मतदारसंघात मतदान पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

माढ्यात भाजपाचा डाव फसणार ; फडणवीसांच्या भेटीनंतर उत्तम जानकर थोरल्या पवारांच्या भेटीला

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा (Madha Lok Sabha) मतदारसंघात राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे . या मतदारसंघातील माळशिरसमधील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी दोन दिवसांपूर्वीच नागपूरला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याच बोललं जात असतानाच आता उत्तम जानकर यांनी राजकारणातले […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

माळशिरस तालुक्यातील कट्टर विरोधकाची मोहिते-पाटलांसोबत हातमिळवणी? पवारांची घेतली भेट; भाजपचं टेन्शन वाढलं!

सातारा : माढा लोकसभा मतदारसंघ मविआसाठी सुरक्षित करण्यासाठी धैर्यशिल मोहिते पाटील यांना उमेदवारी देऊन शरद पवारांनी फासे टाकले. धैर्यशिल मोहिते पाटलांना उमेदवारी दिल्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघ अर्धा जिंकल्याचा विश्वास व्यक्त केला जात असताना आता धैर्यशिल मोहिते पाटील भाजपतील इतर नाराज नेत्यांना शरद पवारांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे माळशिरस तालुक्यातील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘भारत धर्मनिरपेक्ष, तरीही मोदींकडून केवळ हिंदुत्वालाच पाठिंबा का?’ चंद्रपूरात पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणीचा सवाल

चंद्रपूर : काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या CSDS-लोकनीती सर्व्हेमधून निवडणुकीतील मतदान हे हिंदुत्व किंवा राम मंदिराच्या मुद्द्यावर होणार नसून देशातील बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर होणार असल्याचं समोर आलं आहे. तब्बल ६२ टक्के लोकांना सद्यपरिस्थिती नोकरी मिळवणं कठीण झाल्याचं वाटतंय. दरम्यान द पहिल्यांदाच मतदान करणारा तरुण कोणत्या मुद्द्यावरुन आपला उमेदवार ठरवतोय, याबाबत चर्चा करण्यात आली. चंद्रपूरातील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बारामतीत थोरल्या पवारांची अजितदादांच्या शिलेदाराला गळ; बाळासाहेब तावरेंची घेतली भेट

मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा ( Baramati Lok Sabha) मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे . या लोकसभा निवडणुकीत पाठिंबा वाढवण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) बारामतीत आपली सर्व ताकद पणाला लावत अजित पवारांच्या( Ajit Pawar)खास शिलेदारांनाही गळ घालण्याचा सपाटा लावला आहे .याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी माळेगाव कारखान्याचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सातारच्या उमेदवारीसाठी उदयनराजे भोसले दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक झाले ; जितेंद्र आव्हाडांची टीका

मुंबई : सातारा लोकसभा मतदारसंघातून (Satara Loksabha Constituency) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची उमेदवारी आज भाजपडकून निश्चित करण्यात आली आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यांच्या उमेदवारीवर टीका केली आहे . सातारा लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे भोसले दिल्लीच्या तख्तासमोर नतमस्तक झाल्याचे सांगत ते […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कोल्हापुरात मविआचं जोरदार शक्तिप्रदर्शन ; शाहू छत्रपतींचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha )मतदारसंघात आज महाविकास आघाडीचे उमदेवार छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj )यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे . यावेळी शाहू महाराजांचे संपूर्ण कुटुंबीय शक्ती प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते. यावेळी कोल्हापूरचा एकच आवाज..शाहू महाराज…शाहू महाराज अशा घोषणांनी सर्व परिसर दुमदुमून गेला […]