महाराष्ट्र ताज्या बातम्या

अखेर मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे; माजी न्यायमूर्तींसह मंत्र्यांच्या शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर घेतला निर्णय..!

Twitter : @NalavadeAnant जालना मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेलं अन्नत्याग आंदोलन आज मागे घेतलं. दोन माजी न्यायमूर्ती आणि मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने केलेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय चर्चा घडवून पुढील प्रक्रिया केली जाईल असं आश्वासन शिष्टमंडळाकडून देण्यात आलं. आता […]

माझ्या घरावर समाजकंटकांनी केलेला हल्ला पूर्वनियोजित : आमदार प्रकाश सोळंके यांचा आरोप

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. तसा मीसुध्दा या आंदोलनात मागील दोन महिन्यापासून सहभागी आहे, असे सांगतानाच समाजकंटकांनी आपल्या घरावर कशा पद्धतीने हल्ला केला याची आपबीती राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke) यांनी गुरुवारी मंत्रालयासमोरील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितली.  […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी : एकनाथ शिंदे

Twitter : @NalavadeAnant मुंबई उध्दव ठाकरे यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा काडीमात्र नैतिक अधिकार  ठाकरे नाही. कारण मराठा समाजाबद्दल त्यांना किती संवेदना आहेत ते मराठा समाजाला देखील माहीत आहे आणि आम्हाला देखील माहीत आहेत, अशा संतप्त शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना थेट उध्दव ठाकरेंवर प्रहार केला. त्यावेळी यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यात इंपेरिकल […]

ताज्या बातम्या मुंबई

पवईत राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी

Twitter मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ मुंबईत मराठा समाज एकवटत आहे. कँडल मोर्चा, साखळी उपोषण आणि प्रवेश बंदीचा बॅनर उभारत मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी करण्यात येत आहेत. या आंदोलनाचे लोण आता मुंबईत पसरले असून पवई, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन केली जात आहेत. दरम्यान, पवईतील पंचकुटीर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राजकीय व्यवस्था भंपक …तुम्ही उपोषण थांबवा – राज ठाकरे

Twitter : @therajkaran मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांना उपोषण सोडण्याची पत्रातून विनंती केली आहे. इथली राजकीय व्यवस्था भंपक असून त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवं आहे. ते एकदा मिळालं की हे आपली सगळी आश्वासन विसरणार अशी त्यांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण […]

मुंबई ताज्या बातम्या

मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला मुंबईतून जोरदार पाठिंबा

Twitter : @therajkaran मुंबई मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी उपोषण सुरु केले असून जरांगे- पाटील यांनी ‘कुठे असाल तिथे उपोषणाला बसा’ असें आवाहन कालच समाजाला केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईत मराठा समाज एकवटत आहे. पवई येथील सकल मराठा समाजाकडून बैठक आयोजित करण्यात आली होती. यात आंदोलनाचे स्वरूप ठरविण्यात आले. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण आंदोलनाला मराठवाड्यात हिंसक वळण

Twitter @abhaykumar_d नांदेड मराठा आरक्षण प्रकरणी मराठवाड्यात जागोजागी आंदोलनाला हिंसक वळण मिळत आहे. बीड जिल्ह्यात दोन आमदारांच्या घरी जाळपोळ करण्यात आली तर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर येथील आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाचीही संतप्त आंदोलकांनी तोडफोड केली. नांदेडमध्ये दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या घराच्या काचाही संतप्त आंदोलकांनी फोडल्या तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

एकपक्षीय बहुमताचे पाशवी सरकार नको; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन

Twitter : @vivekbhavsar मुंबई लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर आयोजित दसरा मेळाव्याला उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडवट टीका करताना उद्धव ठाकरे यांनी या देशात पुन्हा एका पक्षाचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या शब्दाला फडणवीसांचा पाठिंबा आहे का ? काँग्रेसचा सवाल

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरावली सराटी गावात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी १७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून उपोषण सोडले हे चांगले झाले. मुख्यमंत्री स्वतः गेले म्हणजे सरकार जरांगे यांना भेटले असाच त्याचा अर्थ होतो. पण तिघाडी सरकारमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजप नेते व उपमुख्यमंत्री […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचा पुनरूच्चार करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सामाजिक सलोखा, शांतता राखावी असे आवाहन केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारी सकाळी जालना जिल्ह्यातील आंतरावाली-सराटी येथे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण देणारच अशी ठोस ग्वाही दिली. मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीनंतर जरांगे […]