महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

वाटाघाटी सुरु असताना सांगलीची उमेदवारी जाहीर करणं अयोग्य, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची ठाकरेंवर जाहीर टीका, काँग्रेसच्या उर्वरित उमेदवारांची आज घोषणा

मुंबई – महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा असतानाच काँग्रेसनं गुरुवारी रात्री राज्यातील सात उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात सोलापुरातून प्रणिती शिंदे, नांदेडातून वसंतराव चव्हाण तर पुण्यातून रवींद्र धंगेकरांची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. आता उर्वरित उमेदवारांची यादी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली आहे. सांगलीत चंद्रहार पाटील यांच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

MVA meeting: शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी आज महाविकास आघाडीची बैठक

X: @therajkaran लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) घोषणा झाल्यापासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यासाठी महिना उरला असतानाही प्रमुख पक्षांचं जागावाटप झालेलं नाही. अनेक उमेदवारांची घोषणाही झालेली नाही. यावर निर्णय घेण्यासाठी रोजच्या रोज बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

मविआ आणि वंचितची बोलणी फिस्कटली? अकोल्यासह काँग्रेसचे १२ उमेदवार जाहीर?, मविआच्या बैठकीला आंबेडकरांना निमंत्रण नाही

नवी दिल्ली- महाविकास आघाडी आणि वंचितची बोलणी फिस्कटल्याचं दिसतंय. वंचितनं काँग्रेसच्या सात उमेदवारांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला का, अशी चर्चा सुरु झालीय. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रात १८ ते १९ जागा लढण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. यातील १२ जागांवरच्या उमेदवारांची नावंही निश्चित करण्यात आल्याचं मानण्यात येतंय. काँग्रेसचे संभाव्य उमेदवार १. अकोलाः अभय पाटील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीचा अल्टिमेटम, संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा..

मुंबई – वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मुंबईत पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या सभेला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहिले, मात्र त्यांनी या सभेत भाजपावर हल्लाबोल करतानाच काँग्रेसलाही उपदेशाचे डोस पाजले. या सभेनंतर दिवस उलटला तरी अद्याप वंचित मविआसोबत आहे की नाही, हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळं आता महाविकास आघाडीनं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआचं जागावाटप ठरलं? वंचितसह आणि वंचितशिवाय असे दोन पर्याय? काय आहे गणित?

मुंबई- राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेच्या समारोपाच्या निमित्तानं इंडिया आघाडीची एकजूट मुंबईत पाहायला मिळाली. काँग्रेससोबत इंडिया आघाडीत असलेले सर्वच पक्ष आणि त्यांचे नेते शिवाजी पार्कवरच्या सभेत उपस्थित होते. मात्र या सगळ्यात वंचितच्या प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीकडं सगळ्यांचं विशेष लक्ष होतं. महाविकास आघाडीत सुरु असलेल्या जागावाटपाच्या चर्चांत वंचित नाराज आहे का, असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटणार, बैठकही होणार, रविवारी ऐतिहासिक सभा

मुंबई – भारत न्याय यात्रेचा ६२ दिवसांचा प्रवास करुन, राहुल गांधी आज मुंबईत पोहचतील. मणिपूरहून निघालेली ही यात्रा १४ राज्यांच्या प्रवास करुन मुंबईत दाखल होतेय. आज राहुल गांधी चैत्यभूमीवर जाणार आहेत. रविवारी शिवाजी पार्कात राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेची समारोपाची सभा ऐतिहासिक होण्याची शक्यता आहे. या सभेत इंडिया आघाड़ीची एकजूट पाहायला मिळेल. इंडिया आघाडीतील १५ […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

नितीन गडकरींच्या विरोधात लढण्यासाठी कॉँग्रेसकडे सक्षम उमेदवार – नाना पटोले

X: @therajkaran मुंबई: कॉँग्रेसकडे नागपुरात भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या विरोधात लढण्यासाठी उमेदवार असून यावेळी नागपुरात कॉँग्रेसची विजयी पताका फडकेल असा विश्वास कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी आज व्यक्त केला.  नाना पटोले म्हणाले, नागपूरसह सांगलीची जागा लढणार आहे. नागपूरसाठीही काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे, असेही ते […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

सुजाता आनंदन यांच्या निधनाने पुरोगामी विचारांचा निर्भीड पत्रकार काळाच्या पडद्याआड, नाना पटोलेंचा शोकसंदेश

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक सुजाता आनंदन यांच्या अकाली निधनाचे वृत्त दुःखद आणि मनाला चटका लावून गेले. सुजाता आनंदन यांच्या निधनाने सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणा-या पुरोगामी विचारसरणीच्या निर्भीड पत्रकाराला आपण गमावले आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत. सुजाता आनंदन यांच्या निधनावर दुःख व्यक्त करून पटोले म्हणाले की, सुजाता […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी, पंडालवरच 13 कोटींचा खर्च’; विरोधकांचा हल्लाबोल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्रीही यवतमाळला रवाना झाले आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यावरुन विरोधकांकडून टीका केली जात आहे. यवतमाळच्या सभेसाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आशा सेविका, महिला बचत गटाच्या सदस्यांसह अनेकांना बसमध्ये जबरदस्तीने भरून सभेला घेऊन गेले. विदर्भ मराठवाड्यातील बस मोदींच्या सभेसाठी वापरल्याने जनतेचे हाल […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाविकास आघाडीचे सर्व ४८ जागांवर एकमत – संजय राऊत

X : @NalavadeAnant मुंबई: राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ जागांवर महाविकास आघाडीचे एकमत झालेले असून कोणता पक्ष कोणती जागा लढविणार याचाही मसुदा तयार झाला आहे. त्यावर आता उद्या होणाऱ्या बैठकीत जागावाटप अंतिम केले जाईल आणि शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि वंचितच्या नेत्यांच्या पत्रकार परिषदेत जागावाटप घोषित केले जाईल, असेही ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत […]