महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई राष्ट्रीय

ठाकरे, शरद पवारांनी असमान वागणूक दिली, प्रकाश आंबेडकरांचा आरोप, केवळ काँग्रेसला इतक्या जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव

मुंबई- महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही, यावर अखेरीस वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रकाश आंबेजकर यांनी भूमिका जाहीर केली आहे. आंबेडकरांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहेत. त्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी असमान वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आलाय. इतकंच नाही तर काँग्रेसला राज्यात सात जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्तावही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीचा अल्टिमेटम, संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा..

मुंबई – वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मुंबईत पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या सभेला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहिले, मात्र त्यांनी या सभेत भाजपावर हल्लाबोल करतानाच काँग्रेसलाही उपदेशाचे डोस पाजले. या सभेनंतर दिवस उलटला तरी अद्याप वंचित मविआसोबत आहे की नाही, हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळं आता महाविकास आघाडीनं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआतील जागावाटपाचा तिढा कायम, या सहा जागांवर अडलं जागावाटप, आंबेडकरांच्या निर्णयाकडंही लक्ष

मुंबई – लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या त्याला तीन दिवस उलटले, इंडिया आघाडीची पहिली प्रचाराची सभाही मुंबईत पार पडली, त्यालाही दोन दिवस उलटले. तरीही मविआतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये. महाविकासा आघाडीच्या जागावाटपाचं काय होणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय. मविआतच सहा जागांवर तिढा असल्याचं दिसतंय. त्यात वंचित आघाडीत येणार आणि त्यांना किती जागा मिळणार, यावरुन […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेस-शिवसेनेत जागांवरुन मतभेद – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

X: @therajkaran काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यामध्ये 10 जागांवरून मतभेद आहेत, त्या जागा काँग्रेसही मागत आहे आणि शिवसेना (उध्दव ठाकरे) मागत आहेत. त्यांच्या अनेक चर्चा झाल्या पण ते एकमेकांना जागा सोडायला तयार नसल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. ते अमरावती येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.  आंबेडकर म्हणाले, […]

मुंबई ताज्या बातम्या

माझ्या कमाईतील हा खारीचा वाटा ‘वंचितां’च्या लढ्यासाठी!

मुंबईतील वृद्ध महिलेने स्वतःच्या पेन्शनमधून पैसे जमवून ऍड. प्रकाश आंबेडकर यांना दिला निधी! X: @therajkaran मुंबई: वंचित बहुजन आघाडीच्या परिवर्तन लढ्यासाठी नागाबाई लोखंडे या ज्येष्ठ माऊलीने आपल्या पेन्शनमधील पैसे साठवून एक लाख रुपये आज ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे आंबेडकर भवन, दादर मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीसाठी निवडणूक निधी सुपूर्द केला. नागाबाई लोखंडे यांनी त्यांना मिळणाऱ्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

आज मविआच्या जागावाटपाचा फैसला? प्रकाश आंबेडकर बैठकीला राहणार उपस्थित

मुंबई : आज ६ मार्च रोजी महाविकास आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत निवडणुकीचा फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर हे आजच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी आंबेडकरांच्या ट्विटमुळे महाविकास आघाडीतील युतीबाबत संशय निर्माण झाला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘भाजपसोबत जाणार नाही याची खात्री द्या’, जितेंद्र आव्हाडांच्या पत्रावर प्रकाश आंबेडकरांचं प्रत्युत्तर

X: @therajkaran मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमधील चर्चा अद्याप पूर्ण झाली नसल्याचे वंचितचे प्रकाश आंबेडकर वारंवार सांगत आहेत. काल ४ मार्च रोजी जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकरांना समाज माध्यमातून एक पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मविआचं अखेर ठरलं, वंचितला लागणार लॉटरी?, काय आहे जागावाटपाचा फॉर्म्युला, घ्या जाणून

मुंबई– महाविकास आघाडीचा बहुप्रतिक्षित जागावाटपाचा तिढा सुटल्याचं मानण्यात येतंय. शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात झालेल्या चर्चेनंतर वंचित बहुजन आघाडी मविआत सहभागी होणार असल्याचं स्पष्ट झालंय. बुधवारी मविआची जागावाटपाची बैठक होणार आहे. या बैठकीत वंचितचे पदाधिकारी सहभागी होणार नसले तरी त्याच दिवशी शरद पवारांची भेट प्रकाश आंबेडकर पुण्यात घेणार आहेत. या भेटीनंतर वंचित महाविकास आघाडीत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : वंचितकडून 3 उमेदवारांची नावं जाहीर, मविआसोबतच्या युतीचं काय?

मुंबई : वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीतील युतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. एके ठिकाणी प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीत निमंत्रण नसल्याचं सांगतात, तर दुसऱ्याच ट्विटमध्ये शरद पवारांनी ६ मार्चला चर्चेसाठी आमंत्रण दिल्याचीही माहिती देतात. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत वंचित आणि मविआ एकत्र लढणार की नाही याबाबत नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. वंचित आणि मविआमध्ये […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

प्रकाश आंबेडकरांची स्वतंत्र चूल की भाजपसोबत जाणार? आघाडीकडे चर्चेसाठी ४८ पैकी २६ जागांचा प्रस्ताव सादर

X : @therajkaran मुंबई: प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने आज महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi – MVA) लेखी पत्र देऊन महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण ४८ पैकी २६ जागांवर आघाडी करण्यासाठी चर्चा होऊ शकेल, असे स्पष्ट केले. वंचितने या २६ मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी तयारी केली आहे, पण आता महाविकास आघाडी आमच्यासोबत जागा वाटपाची चर्चा करण्यास […]