ताज्या बातम्या महाराष्ट्र

माढ्यात थोरल्या पवारांची तोफ धडाडणार ; मोहिते पाटलांसाठी खुद्द शरद पवार मैदानात !

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे . या मतदारसंघात शरद पवार (Sharad pawar) गटाकडून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणं धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel mohite patil) निवडणूक लढवत आहेत. यासाठी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार बंडखोरांसह भाजपविरोधात लढण्यासाठी स्वतः मैदानात उतरले असून आज मोहिते पाटलांच्या प्रचारासाठी ते माढा तालुक्यातील मोडनिंबमध्ये येणार आहेत . आज त्यांची बुलंद तोफ धडाडणार आहे . त्यामुळं शरद पवार आज नेमकं काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

विशेष म्हणजे माढा तालुक्यात आमदार बबनदादा शिंदे (Babandada Shinde) आणि त्यांचे बंधू आमदार संजयमामा शिंदे (Sanjaymama shinde) यांचेवर्चस्व आहे. या दोन्ही बंधुंनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर प्रथमच शरद पवार यांची माढा तालुक्यात एखादी राजकीय सभा पार पडत आहे.दरम्यान, थोड्याच वेळात शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी मोडनिंबमध्ये येणार आहेत. सुरुवातीपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धक्क्यावर धक्के देत असलेले पवार आजच्या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. दरम्यान, मोडनिंब येथील सभा झाल्यावर शरद पवार हे मोहोळ येथे सभा घेणार आहेत. मोहोळमध्ये भाजपचे नेते संजय क्षीरसागर हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.

या मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा रणजितसिंह निंबाळकरांना ( Ranjeetsingh Naik Nimbalkar ) संधी देण्यात आली आहे. त्यामुळं मोहिते पाटील नाराज होते. धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, त्यांना भाजपनं डावलले. निंबाळकरांनाच भाजपनं पुन्हा एकदा रिंगणात उतरवलं आहे. त्यानंतर मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करत हाती तुतारी घेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला . आता त्यांच्या प्रचारासाठी खुद्द शरद पवार हे मैदानात उतरले आहेत . त्यामुळे थोरले पवार आता या सभेतून कोणावर निशाणा साधणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहचली आहे .

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात