मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या मतदारसंघातून प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या पार्श्वभूमीवर आता भाजपाचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी नांदेड येथे घेतलेल्या प्रचारसभेत महाविकास आघाडीवर (mva )टीका केली आहे . राज्यात एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी आणि अर्धी उरलेली काँग्रेस आहे, असे ते म्हणाले होते . यावर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “एका पक्षाचे दोन तुकडे करायचे आणि मग आपण त्यातल्या एकाला नकली म्हणायचं. ज्यांनी फोडा-फोड केली त्यांनीच त्यात कोण असली आणि कोण नकली ठरवणं योग्य नाही. खरंतर कोण असली, कोण नकली, हे महाराष्ट्रातील जनतेला हे ठरवू दिलं पाहीजे. जनतेने हा निकाल घेतला आहे, तो मतपेटीतून दिसेल”, अशी टीका जयंत पाटील यांनी शहांवर केली आहे .
नांदेडमध्ये भाजपचेचे वातावरण आहे. ही निवडणूक मोदींना पंत्रप्रधान करण्याची आहे. प्रतापराव यांना मत म्हणजे मोदींना मत. मनमोहन सिंग यांनी आपली अर्थव्यवस्था 11 व्या नंबरला सोडून गेले होते ती आज पाचव्या स्थानावर आली आहे असे ही ते म्हणाले . दरम्यान शरद पवारांसारखा मोठा नेता ज्यांनीे महाराष्ट्रात अनेक वर्ष काम केलं, पण त्यांनाही या राज्याचा विकास करता आला नाही. आता नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी हे दोन अर्धे पक्ष आणि त्यांच्यासोबत जाऊन अर्धी झालेली काँग्रेस राज्याच्या विकासाच्या गप्पा मारत आहेत. पण या राज्याचा विकास ही तीन चाकांची रिक्षा करु शकणार नाही. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणे गरजेचे आहे.’, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर हल्ला चढवला होता . त्यांच्या या टीकेवर आता जयंत पाटील यांनी पलटवार देत प्रत्युत्तर दिल आहे .
दरम्यान यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी शरद पवार (Sharad Pawar) एनडीएत सहभागी होण्यासाठी तयार होते. या दाव्यावर प्रत्युत्तर दिल आहे . ते म्हणाले , यांचे सर्वांचे (अजित पवार गट) प्रयत्न होते की शरद पवारांना एनडीएत घेऊन जायचे. शरद पवार जर तयार असते, तर एनडीएत गेलेच असते. पण ते कधीच तयार नव्हते. शरद पवार यांनी भाजपाची विचारसरणी स्वीकारायला नकार दिला. त्यामुळे आमचा पक्ष फुटला. मात्र पक्ष फुटला तरी शरद पवार यांनी विचारधारा न सोडण्याचा निर्णय घेतला आहे . .