ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवसेना पक्ष हा फक्त आणि फक्त ठाकरेंचाच ; मिंध्याना मी मानतच नाही ; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

मुंबई : आगामी लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजप( bjp )आणि शिंदे गटावर (shinde group )सडकून टीका केली आहे . बाळासाहेबांच्या शिवसेनेत बंडखोरी करून गद्दारी करणाऱ्या मिंध्याना मी मानतच नाही . या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने दुपटीने ताकद वाढवली आहे. शिवसेना पक्ष हा फक्त आणि फक्त ठाकरेंचाच आहे. आताच्या घडीला सर्वात लाडका मुख्यमंत्री मंत्री म्हूणन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं नावं आहे, हे मी नाही सर्व्हे सांगतो”, असा दावा करत त्यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला आहे .

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)यांनी भंडाऱ्यातील प्रचारसभेत बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता . आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडला नाही. उद्धव ठाकरे यांच्या पुत्रप्रेमाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुत्रीप्रेमाने राष्ट्रवादी पक्ष फुटला, अशी टीका त्यांनी केली होती. त्यांच्या या टीकेलाही सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिल आहे . त्या म्हणाल्या , पुत्रीप्रेम आणि पुत्रप्रेम हे म्हणतात, भ्रष्टाचारावर प्रेम करण्यापेक्षा आपल्या मुलामुलींवर प्रेम करणं कधीही चांगल आहे हो…”, अशा शब्दांत त्यांनी मंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे .“शिवसेना आणि राष्ट्रवादी अनेक वर्ष एकमेकांच्या विरोधात लढले. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी एकमेकांवर टीकाही केली. पण त्यांनी त्यांचं वैयक्तिक नातं जपलं. माझं लग्नं ठरवण्यात त्यांचा मोठा वाटा होता”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या..

आताच्या घडीला या मिंध्यानि ईडी आणि सीबीआय बाजूला ठेवून आमच्याशी लढून दाखवाव. तुम्ही 40 पार म्हणताय आम्ही तर 48 पार म्हणू. ह्या देशाचा कृषीमंत्री कोण आहे? त्याचं नावं मला सांगावं. त्याचं नावं अर्जुनकुमार मुंडा आहे, कुणाला माहिती आहे का? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज जेलमध्ये आहेत आणि अशोक चव्हाण कुठे आहेत आज? ईडीचा आधार घेऊन हे सगळ्यांना घाबरावतायत असा हल्लाबोल त्यांनी चढवला .

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

About Author

सुप्रिया गाडीवान (Supriya Gadiwan) यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून Masters in Journalism केले आहे. या आधी त्यांनी Speed ​​News live 24 आणि Behind the News in Kolhapur या news portal साठी काम केले आहे. राजकीय बातम्या लिहिणे, पोर्टल चे समाज माध्यम सांभाळणे, बातमी संपादन यात त्यांचा हातखंडा आहे. सध्या त्या राजकारण (therajkaran.com) या मुंबईतील मराठी न्यूज पोर्टल साठी राजकीय बातमीदारी करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात