मुंबई- सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण, हा तिढा अजूनही कायम आहे. काँग्रेसची जागा असलेल्या या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेनं जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली. यामुळं सांगलीती काँग्रेस नेते अस्वस्थ झालेले आहेत. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा हक्काचा मतदारसंघ असलेल्या या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची दीड ते दोन लाखं मतं असतानाही काँग्रेसच्या उमेदवाराला डावलण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद किती
कोल्हापूरची जागा शाहू छत्रपतींसाठी काँग्रेसला सोडल्यानंतर, पश्चिम महाराष्ट्रात जागा नाही, यासाठी सांगलीसाठी आग्रही भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतली. सांगलीत ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्यही नसताना लोकसभा जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. संजय राऊत यांनी घेतलेल्या दुरग्राही भूमिकेतून हे झाल्याचं सांगण्यात येतंय. ठाकरेंकडे उमेदवार नसताना प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रहार पाटील यांना ठाकरेंकडे पाठवले आणि त्यांना उमेदवारी देण्याचं निश्चित करण्यात आलं.
जयंत पाटील यांनी केला गेम?
वसंतदादा यांचे नातू विशाल पाटील हे या लोकसभेच्या जागेवरुन लढण्यास इच्छुक होते. कांग्रेस आमदार विश्वजीत कदम हेही पाटील यांच्यासाठी या जागेसाठी आग्रही होते. मात्र तरीही विशाल पाटील यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाला संधी देण्यात आली नाही. जयंत पाटील यांना सांगली जिल्ह्यात नवं नेतृत्व नको असल्यानं त्यांनी संजय राऊत यांचं प्यादं म्हणून वापर करुन घेतल्याची चर्चा सध्या रंगताना दिसतेय.
सांगलीत विश्ला पाटील यांची हक्क्याची दीड ते दोन लाखं मत आहेत, त्यासाठी त्यांच्या काकांचीही मदन पाटील मतं त्यांच्यासोबत मिळाली असती. विश्वजीत कदम यांची हक्काची मतंही काँग्रेससोबत होती. २०१९ लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटील हे केवळ २ लाख मतांनी मतांनी विजयी झाले होते. त्यामुळं काँग्रेसचा या जागेवरचा दावा योग्य होता, असं सांगण्यात येतंय.
भाजपासाठी जागा सोडल्याचीही चर्चा
जयंत पाटील यांचा राजकीय स्वार्थ आणि संजय राऊत, उद्धव ठाकरे यांनी भाजपाचा मार्ग सुकर करण्यासाठी ही जागा सोडल्याची चर्चा आहे. या सेटलमेंटमध्ये नेमकं कुणाच्या पदरात काय पडलंय हे जाणून घेण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचाःठाकरेंनी मुंबईसाठी काय केलं? आदित्य ठाकरेंच्या अहंकारामुळं युती तुटली, काय म्हणालेत आशिष शेलार?