मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात गेल्या दोन दिवसांपासून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde )यांच्या नावावर शरद पवार (Sharad Pawar )गटांकडून शिक्कामोर्तब करण्यात आल्याची चर्चा रंगली होती. मात्र, निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नसलेल्या श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil )यांनी आता आपल्या मुलासाठी म्हणजे सारंग पाटील यांच्यासाठी (Sarang Shriniwas Patil)आग्रही मागणी केल्याने ही उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे .
लोकसभा निवडणूक तोंडावर आल्या तरी सातारा लोकसभा मतदारसंघातील जागेचा तिढा सुटता सुटत नव्हता . या अनुषंगानेच आज राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या निवासस्थानी श्रीनिवास पाटील, सारंग पाटील शरद पवार यांच्यात बैठक झाली . यावेळी आपण कोणत्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढणार असल्याची भूमिका श्रीनिवास पाटील यांनी मांडली आहे. तसेच आपल्या मुलाला उमदेवार देण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे . ते पुढे म्हणाले की, शरद पवार संसदीय बोर्डाच्या माध्यमातून अंतिम निर्णय घेतला जाईल आणि तो आम्हाला मान्य असेल.दरम्यान दुसरीकडे शशिकांत शिंदे यांनी आजही स्थानिक परिस्थिती काय आहे याचा आढावा आमच्याकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आदेश दिल्यास आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरून निवडणूक लढू असे स्पष्ट केले. सारंग पाटील यांच्या उमेदवारीसाठी श्रीनिवास पाटील ठाम आहेत. शशिकांत शिंदे यांनी पक्षाने आदेश दिल्यास रणांगणात उतरून महायुतीच्या विरोधात जोरदार लढत देण्याची तयारी असल्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेतला जाणार याकडे सातारावासियांचं लक्ष आहे. आज सातारचा उमेदवार जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
याआधी सातारा लोकसभेच्या रिंगणातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी माघार घेतली आहे. तब्येत ठीक नसल्यानं मी निवडणूक लढवू इच्छित नाही, असं पाटील यांनी शरद पवारांना कळवलं होत . मात्र आता पुन्हा त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे . तसेच आता तरी सातारच्या मतदारसंघात (Satara Lok Sabha)उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहचली आहे .