नवी दिल्ली – जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आलीय. देशातील 543 लोकसभा मतदारसंघांत सात टप्प्यात निवडणुका होणार असून, मतमोजणी 4 जूनला होणार आहे. महाराष्ट्रात 5 टप्प्यांत लोकसभा निवडणुका होणार आहेत.
लोकसभा निवडणुका सात टप्प्यात
- 19 एप्रिल
- 26 एप्रिल
- 7 मे
- 13 मे
- 20 मे
- 25 मे
- 1 जून
महाराष्ट्रात कधी होणार मतदान
- पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर
- दुसरा टप्पा – 26 एप्रिल – बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
- तिसरा टप्पा – 7 मे -रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, माढा, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
- चौथा टप्पा – 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीज
- पाचवा टप्पा – 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण
4 विधानसभा राज्यांच्या निवडणुकाही होणार
या लोकसभा निवडणुकांसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांचं मतदानही याच काळात होणार आहे. तसंच विविध राज्यांतील 26 विधानसभांच्या पोटनिवडणुकाही याच काळात होणार आहेत.
ईव्हीएमवरच होणार निवडणुका
हायकोर्ट ते सुप्रीम कोर्टासमोर 40 वेळा ईव्हीएमच्या मुद्द्यावर सुनावण्या झालेल्या आहेत. कोर्टानं या सगळ्या याचिका फेटाळून लावलेल्या आहेत. यावर एक पुस्तकही तयार करण्यात आल्याचं निवडणूक आय़ुक्त राजीव कुमार यांनी सांगितलंय. अधुरी हसरतो का इल्जाम, हर बार हमपे लगाना ठिक नही, असा ईव्हीएमचा शेरही यावेळी निवडणूक आयुक्तांनी ऐकवला.