मुंबई- महाविकास आघाडीचं 48 पैकी 44 जागांचं वाटप पूर्ण झाल्याची माहिती आहे. यात आता वंचितचा समावेश मविआत नसेल हे स्पष्ट झालेलं आहे. उर्वरित चार जागांचा निर्णय लवकरच होईल असं सांगण्यात येतंय. या चार जागांत सांगली, भिवंडी आणि मुंबईतील दोन मतदारसंघांचा समावेश आहे. या चार जागांवर तिढा सुटला नाही तर या चारही मतदारसंघात बंडखोरी किंवा मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे. ठाणे आणि मुंबईतील मतदान अखेरच्या टप्प्यात असल्यानं यातील चार जागांचा तिढा उशिरा सुटण्याची शक्यता आहे.
कुणाच्या वाट्याला किती जागा?
महाविकास आघाडीतील 44 जागांचं वाटप कसं झालेलं आहे तेही पाहूयात.
ठाकरेंची शिवसेना- 19 जागा
- जळगाव
- परभणी
- नाशिक
- कल्याण
- ठाणे
- रायगड
- मावळ
- धाराशिव
- रत्नागिरी
- बुलढाणा
- हातकणंगले
- मुंबई ईशान्य
- उत्तर मुंबई
- हिंगोली
- संभाजीनगर
- शिर्डी
- यवतमाळ – वाशिम
- दक्षिण मुंबई
- पालघर
काँग्रेस – १६ जागा
- नंदुरबार
- गडचिरोली
- चंद्रपूर
- नांदेड
- मुंबई उत्तर मध्य,
- सोलापूर
- धुळे
- नागपूर
- पुणे
- लातूर
- अकोला
- अमरावती,
- भंडारा गोंदिया,
- कोल्हापूर
- जालना
- रामटेक
एनसीपी शरद पवार . ९ जागा
- बारामती
- शिरूर
- सातारा
- माढा
- रावेर
- दिंडोरी
- अहमदनगर
- बीड
- वर्धा
तिढा असलेल्या चार जागा – भिवंडी, सांगली, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम
या चारही जागांवर काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात तिढा आहे. सांगलीत तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी ठाकरेंच्या शिवसेनेनं जाहीर केलीय. तर जागावाटपाची चर्चा पूर्ण होण्याआधीच अशी उमेदवारी जाहीर करणं अयोग्य असल्याचं मत काँग्रेसनं व्यक्त केलंय. आता यावर काय तोडगा निघतो हे पहावं लागणार आहे.
हेही वाचाःVijay Shivtare: कमळ चिन्हावर लढेन पण बारामतीतूनच लढेन; विजय शिवतारेंनी दिलं अजितदादांना टेन्शन