केंद्र सरकारविरोधात उद्या इंडिया आघाडीची महासभा, रामलीला मैदानात विरोधकांचं शक्तिप्रदर्शन
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर इंडिया आघाडीला नवे बळ मिळाले आहे. आता विरोधकांची ही एकजूट रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर ताकदीने पाहायला मिळणार आहे. यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. रॅलीच्या आयोजनाची मुख्य जबाबदारी आम आदमी पक्षाच्या खांद्यावर आहे, तर काँग्रेस आणि इतर घटक पक्ष रॅली यशस्वी करण्यासाठी मदतीची भूमिका बजावत आहेत. […]









