जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

पंकजा मुंडेंचं आज शक्तिप्रदर्शन, उदयनराजेंच्या उपस्थितीत दाखल करणार उमेदवारी अर्ज

बीड- बीडच्या भाजपा उमेदवार पंकजा मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मराठवाड्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि सगळ्यांचं लक्ष असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात काय होणार, याकडं सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. पंकजा मुंडे या निमित्तानं मोठं शक्तिप्रदर्शन करीत हा अर्ज दाखल करणार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हेही या वेळी उपस्थित असतील. गेल्या काही दिवसांपासून […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील 8 जागांसाठी आज प्रचाराच्या तोफा थंडावणार, कुठे आहे मतदान, काय तयारी?

मुंबई- महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदारसंघांसह देशातील 89 जागांसाठी शुक्रवारी 26 एप्रिलला मतदान पार पडणार आहे. आज संध्याकाळी पाच वाजता या टप्प्यातील मतदारसंघातील जाहीर प्रचार थंडावणार आहे. अखेरच्या दिवशी प्रचारासाठी अमित शाहा हे अमरावतीत येत असून, राहुल गांधी हे सोलापूर आणि अमरावतीत प्रचार करणार आहेत. राज्यात कोणत्या आठ मतदारसंघांत शुक्रवारी मतदान होणार आहे हेही जाणून घेऊयात. […]

ताज्या बातम्या जिल्हे महाराष्ट्र मुंबई

अमरावतीत अमित शहांच्या सभेच्या मैदानावरुन हायव्होल्टेज ड्रामा, दंगल होऊ नये म्हणून माघार, बच्चू कडूंची घोषणा

अमरावती- नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी आज होणारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आधीच वादात सापडली आहे. ही सभा ज्या ठिकाणी होणार आहे, त्या सायन्स कोअर मैदानावर त्याच दिवशी सभेची परवानगी बच्चू कडू यांनी मिळवली होती. मात्र अमित शाहा यांच्या सभेला परवानगी देण्यात आली. यानंतर संतापलेल्या बच्चू कडू यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांच्यासोबत या मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला. यावरुन […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भिवंडी मतदारसंघात महाविकास आघाडीत नाराजीचा सूर

भिवंडी : सांगली, नगरनंतर आता भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत नाराजीचा सूर उमटल्याचं पाहायला मिळत आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून दावा केला जात होता. मात्र शरद पवार गटाने भिवंडी लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचून घेत सुरेफ उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र काँग्रेस नेत्यांमध्ये यामुळे नाराजी आहे, आणि ते मविआच्या उमेदवाराला प्रचारात साथ […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शिवसेना पक्ष हा फक्त आणि फक्त ठाकरेंचाच ; मिंध्याना मी मानतच नाही ; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

मुंबई : आगामी लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजप( bjp )आणि शिंदे गटावर (shinde group )सडकून टीका केली आहे . बाळासाहेबांच्या शिवसेनेत बंडखोरी करून गद्दारी करणाऱ्या मिंध्याना मी मानतच नाही . या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली ; मोदी -शहांना ओपन चॅलेंज ; “हिम्मत असेल तर या ठाकरेला संपवून दाखवा”

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत . या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे . या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray )यांची परभणीत जाहीर सभा पार पडली. परभणीचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचाराच्या निमित्ताने त्यांची ही सभा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बारामतीचा किल्लेदार म्हणून नेमलेले अजितदादा आता फितूर झालेत ; उत्तम जानकरांचा हल्लाबोल

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये (Baramati Lok Sabha)नणंद-भावजय अर्थात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. त्यामुळे बारामतीची निवडणूक ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. अशातच अजित पवार गटाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar)यांनी शरद […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

भाजपच्या वाटेवर असलेल्या एकनाथ खडसेंची उणीव भासणार ; रोहिणी खडसे

मुंबई : आगामी लोकसभेसाठी रावेर मतदारसंघात राजकीय घडामोडीना चांगलाच वेग आला आहे . गेल्या काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी (Eknath Khadse) भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे . मात्र त्यांची कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच राहणे पसंत केले आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री सतीश पाटील (Satish Patil) यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांची भाजपविरोधात खेळी ; फडणवीसांचे निकटवर्तीय राष्ट्रवादीत जाणार

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी सोलापूरमधून भाजपला मोठा धक्का दिला आहे .सोलापूरमधील भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे विश्वासू संजय क्षीरसागर ( Sanjay kshirsagar) शरद पवार गटात (Sharadchandra Pawar group )प्रवेश करणार आहे. भाजपमध्ये आपला अपमान होत असल्याचे सांगत त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर केला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःची भीती टाळण्यासाठी फडणवीसांनी पक्ष फोडले ; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असतानां सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत . अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनी एका मुलाखतीत बोलताना महाविकास आघाडीच्या नेत्यांचा भाजपमधील मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचा डाव होता असा आरोप केला आहे . याला आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी चोख प्रत्युत्तर दिल […]