ताज्या बातम्या महाराष्ट्र

तुतारी कोणाची ? बारामतीत अपक्ष उमेदवाराला “तुतारी ” ; शरद पवारांच्या पक्षाची आयोगाकडे धाव

मुंबई : राज्यासह देशभरात निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच आता सुरूवातीपासून चर्चेत असलेला बारामती मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ( Baramati Lok Sabha Constituency ) उमेदवारांना निवडणूक चिन्हं बहाल करण्यात आली. या चिन्ह वाटपात शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाले आहे. तर दुसऱ्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

नेमक्या कुणाच्या अटकेचा होता प्लॅन, एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? अटकेच्या भीतीनं फडणवीसांनी ठाकरे सरकार पाडलं, काय म्हणालेत संजय राऊत?

मुंबई- मविआ सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि गिरीश महाजन यांच्या अटकेचं षडयंत्र रचलं जात होतं, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका मुलाखतीत केला आहे. लोकसभा निवडणुकींच्या प्रचाराच्या रणधुमाळीत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या दाव्यानं नवं राजकारण रंगलेलं आहे. खोट्या गुन्हात या चारही नेत्यांना अडकवण्याचा कट होता, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केलाय.२०२४ च्या […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

साताऱ्याच्या बदल्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यसभेची जागा, काय निघालाय तोडगा?

मुंबई- महायुतीत अद्यापही जागावाटटपाचा तिढा सुटलेला दिसत नाहीये. अद्यापही दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण आणि नाशिक या सात मतदारसंघातील उमेदवार जाहीर झालेले नाहीत. अशात राज्यात १६ जागा शिंदेंची शिवसेना लढणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलंय. आत्तापर्यंत शिंदेंच्या शिवसेनेचे १० उमेदवार जाहीर झाले आहेत. या सातपैकी सहा जागी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा 29 पटींनी वाढला भाजपा? अवघ्या 5 महिन्यांत 10 कोटींहून अधिक सदस्य, 21 राज्यांत सरकार

नवी दिल्ली- 2014 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा मुंबईच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सभेत करण्यात आली. त्यानंतर गेल्या 10 वर्षांत भाजपाचा विस्तार प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला आहे. 2014 नंतर भाजपानं सत्तेत आल्यानंतर सर्वसमावेशक भूमिका घेत, पार्टी विथ डिफरन्स या मूल्याला बाजूला ठेवत पक्षाचा विस्तार केला. देशातील सर्व प्रांतात, सर्व जाती-धर्मांत भाजपाचा झालेला […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

भाजपाच्या विरोधाचे मुद्दे अजित पवार राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात, काय आहेत संकेत?

मुंबई- काँग्रेस आणि भाजपाच्या जाहीरनाम्यांनंतर प्रादेशिक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय. अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. राष्ट्रासाठी राष्ट्रवादी, असं या जाहीरनाम्यातून जाहीर करण्यात आलेलं आहे. राज्यातील इतर प्रादेशिक पक्षांनी कोणताही जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नसताना जाहीरनामा प्रसिद्ध करत अजित पवारांनी आघाडी घेतल्याचं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावरील ‘संघर्षयोद्धा’ होल्डवर

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारविरोधात बंडाची तलवार उगारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट संघर्षयोद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २६ एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सेन्सॉर बोर्डाने प्रदर्शनासाठी हा चित्रपट होल्डवर ठेवला आहे. सेन्सॉर बोर्डाकडून आचार संहितेचे कारण […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

विशाल पाटलांवर काँग्रेसकडून कारवाई होणार, 25 तारखेला घेणार निर्णय

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात पक्षाचा आदेश फेटाळून अपक्ष निवडणूक लढवणारे विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. काल 22 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. तरीही त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने पक्षाकडून यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे. याबाबत 25 […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन नवनीत राणा भाजपमध्ये; रवी राणांचा खळबळजनक दावा

अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नेतेमंडळींमनध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. दरम्यान गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडणूक जिंकलेल्या आणि काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करीत अमरावतीतून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या नवनीत राणा यांच्या पतीने खळबळजनक दावा केला आहे. शरद पवार यांचे आशीर्वाद घेऊनच नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा रवी राणा यांनी केला आहे. नवनीत राणा […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

राहुल गांधी म्हणाले, हुकूमशाहीचा खरा चेहरा समोर, काँग्रेसने सांगितली सूरतमधील भाजपच्या विजयामागील क्रोनोलॉजी

नवी दिल्ली : गुजरातमधील सूरत लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार मुकेश दलाल सोमवारी (22 एप्रिल) बिनविरोध निवडून आले आहेत. काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र आता काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी भाजप उमेदवाराच्या विजयावर सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी या यशाची तुलना हुकूमशाहीशी केली आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर लिहिलं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

विशाल पाटील ‘लिफाफा’ चिन्हावर निवडणूक लढवणार, काँग्रेसबद्दलची खदखद व्यक्त केली

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. आज (22 एप्रिल) तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला, आणि अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. विशाल पाटील लिफाफा चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. यादरम्यान पत्रकार परिषदेत विशाल पाटील यांनी […]