ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षणाच्या विजयी सभेत दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर का?

धुळे मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे ओबीसींवर अन्याय होत असल्याची टीका ओबीसी नेत्यांकडून केली जात आहे. अद्याप सरकारने अध्यादेश काढला नसून हा केवळ मसूदा आहे, याविरोधात मोठ्या संख्येने हरकती पाठवल्या जातील असं ओबीसी नेत्यांकडून सांगितलं जात आहे. आता याविरोधात काँग्रेसकडूनही टीका केली जात आहे. संभ्रम निर्माण करून मराठा समाजाची फसवणूक करणे योग्य नाही, सरकारने खुलासा करावा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘राज्यभरात मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाची होळी करू’; ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा संताप

पुणे ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर संताप व्यक्त केल्यानंतर आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ही फसवणूक ओबीसींची की मराठा समाजाची हे येत्या काळात स्पष्ट होईलच. या निर्णयाविरोधात राज्यभरात आक्रोश आंदोलन करू आणि मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या अध्यादेशाची होळी करू असं शेंडगे यावेळी म्हणाले. आता ओबीसी आरक्षणाचं […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘आरक्षण घेऊन असा कुठला विजय मिळवला? जरांगे लढ्यात जिंकले, परंतु तहामध्ये हरले’, OBC नेते हरिभाऊ राठोडांचा संताप

मुंबई मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा लढा तीव्रतेने लढला, त्यांना प्रचंड प्रतिसाद मराठा बांधवांनी दिला. एक प्रकारे ही लढाई त्यांनी जिंकली, परंतु तहामध्ये मात्र हरले, असे चित्र उभे ठाकले आहे, अशा शब्दात ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी आपली भूमिका व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आंदोलन करणाऱ्या त्यांच्या मावळ्यांच्या, वंचित […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘जाहीरपणे छ. शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती, तिच पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय’

नवी मुंबई ‘मलाही गोरगरीब समाजाचे दु:ख आणि वेदना याची कल्पना आहे. म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. ती शपथ पूर्ण करण्याचे काम हा एकनाथ शिंदे करत आहे, दिलेला शब्द पाळणे हीच माझी कार्यपद्धती आहे,’ मराठ्यांना आरक्षणाचा अध्यादेश दिल्यानंतर व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘जरांगेंना दिलेला अध्यादेश नव्हे, मसुदा!’ मराठा आरक्षणाच्या गुलालाला छगन भुजबळांचं आव्हान

मुंबई आरक्षणाच्या बाबतीत 50 टक्क्यांच्या समुद्रात पोहोणाऱ्या मराठा समाजाला आता १७ टक्क्यांमध्ये विहिरीत पोहावं लागणार आहे. झुंडशाहीने नियम कायदे बदलता येत नाही. मंत्रिमंडळात जाताना कुणालाही न घाबरता आम्ही निर्णय घेऊ अशी शपथ घेत असतो, अशा शब्दात ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावर संताप व्यक्त केला. जरांगे पाटलांना दिलेला जीआर की केवळ एक सूचना आहे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला मोठं यश, सरकारकडून सर्व मागण्या मान्य

नवी मुंबई मराठा आरक्षणाच्या लढाईला अखेर यश आलं असून मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. सरकारने मध्यरात्री याबाबतच बैठक घेऊन पहाटे अध्यादेश काढला असून तो जरांगे पाटलांकडे पाठवण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या सर्व मागण्या मान्य केल्याचं जाहीर केलं. याशिवाय समाज म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुलांना 100% शिक्षण मोफत ते आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती थांबवा, मराठा आंदोलकांच्या किती मागण्या मान्य?

मराठा आरक्षणासाठी मुंबईत दाखल झालेल्या मराठा बांधवांच्या अनेक मागण्या राज्य सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. उद्यापर्यंत राज्य सरकारने सगेसोयरे संदर्भातील अध्यादेश जाहीर करावा, अन्यथा उद्या आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याचं अल्टीमेटम मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलं आहे. किती आणि कोणत्या मागण्या मान्य?१ शिंदे समिती रद्द करू नये, या समितीने मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधत […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटलांवर होणार मुंबईत फुलांचा वर्षाव, पालिकेला दिले आदेश

मुंबई मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीहून निघालेला मराठा बांधव आज नवी मुंबईत मुक्काम करणार आहे. मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला उद्यापर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. मोठ्या संख्येने सुरू असलेल्या मराठा बांधवांच्या आंदोलनामुळे राज्य सरकार कात्रीत सापडलं आहे. असं असतानाही मुंबईत प्रवेश केल्यानंतर मनोज जरांगे पाटलांचं स्वागत करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून जरांगे पाटलांवर फुलांचा वर्षावही केला जाणार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

…तर ओबीसीवर प्रचंड अन्याय होईल; हरिभाऊ राठोडांकडून ओबीसी नेते आणि सरकारचा निषेध

मुंबई मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा प्रण मनोज जरांगे पाटील यांच्यासह समस्त मराठा बांधवांनी केला आहे. आज सकाळपासून नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात मराठा बांधव भगवे झेंड, टोपी घातलेले दिसून येत आहे. सरकारकडून जरांगे पाटलांचं आंदोलन रोखण्याचा प्रयत्न सुरू होता. सरकारच्या शिष्टमंडळाकडून जरांगे पाटलांना जीआर देण्यात आला आहे. त्यावर चर्चा सुरू असून येत्या काही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

एका महिन्यात आरक्षण देण्याची वल्गना करणारे देवेंद्र फडणवीस गप्प का? नाना पटोलेंची जहरी टीका

मुंबई मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे, सरकारने त्यांच्याशी चर्चा केली, राणाभिमदेवी थाटात अनेक घोषणा केल्या. मराठा समाजाला आरक्षण देणारच असे जाहीरपणे सांगितले तरीही अद्याप आरक्षण मात्र दिलेले नाही. सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. मुंबईत येण्याचा इशारा दिल्यानंतरही सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत. मराठा समाजाला आरक्षणाच्या नावाने […]