ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकीत उमेदवाराला खर्चाची किती मर्यादा? कार्यकर्त्यांच्या खाण्या-पिण्यावर किती खर्चाची परवानगी?

मुंबई – लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे. जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्यात. काही जणांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. आता काही भागात प्रचारसही सुरु झालेला आहे. अशात निवडणुकीसाठी आणि प्रचारासाठी होणाऱ्या खर्चाची चर्चा रंगू लागलेली आहे. या लोकसभा निवडणुकीत गेल्या काही निवडणुकांपेक्षा जास्त खर्च केला जाईल असंही छातीठोकपणे सांगण्यात येतंय. राज्यात बदललेली राजकीय समीकरणं, महायुती विरुद्ध मविआ […]

ताज्या बातम्या जिल्हे महाराष्ट्र

गाडीवर हल्ला करण्याचा भाजपा कार्यकर्त्यांचा प्रयत्न, सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंचा आरोप

सोलापूर – राज्यातील काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीची घोषणा गुरुवारी करण्यात आली. त्यात सोलापुरातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यानंतर गुरुवारी रात्री त्यांच्या गाडीवर भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय. या आरोपामुळं राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. नेमकं काय घडलंय? प्र्णिती शिंदे गेल्या […]

जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना तातडीनं पोलीस संरक्षण द्या, सुप्रिया सुळे यांची मागणी

पुणे- लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झालीय. त्यात बारामती या लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळतोय. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी पवार कुटुंबातील अनेक सदस्य घराबाहेर पडताना पाहायला मिळतायेत. अशात अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्याशी दोन दिवसांपूर्वी अजित पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वाद घातल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर बारामतीच्या खासदजार सुप्रिया सुळे यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीत आघाडीत-बिघाडी, काँग्रेसचा उमेदवार ठाकरे गटाच्या नेत्याला देणार टक्कर

अकोला : आज काँग्रेसकडून लोकसभेसाठी सात उमेदवारांसह अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवाराचीही घोषणा करण्यात आली आहे. अकोला महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र आजच शिवसेना ठाकरे गटाच्या आढावा बैठकीत बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दोन टर्म नगरसेवक राहिलेले राजेश मिश्रा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या 7 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पुण्यातून धंगेकर तर कोल्हापूरातून कोण?

Congress Lok Sabha first List Announced : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून कोल्हापूरातून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेस महाराष्ट्रात ४८ पैकी १८ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महाविकास […]

महाराष्ट्र अन्य बातम्या मुंबई

NCP : विजय शिवतारेंचे तोंड आवरा : राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा 

X : @NalavadeAnant मुंबई: तुमच्या – आमच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे, तरच आपल्याला येत्या लोकसभा निवडणुकीत फायदा होणार आहे. अन्यथा महायुती फक्त कागदावरच आणि प्रत्यक्षात मात्र कार्यकर्त्यांमध्ये असाच विसंवाद राहिला तर अवघड जाऊ शकते, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळत दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय […]

Political map of Marathwada showing shifting influence in Operation Tiger and impact on Uddhav Thackeray’s stronghold. महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sangli Lok Sabha : भाजपची अवस्था कचरा गोळा करणाऱ्या गाडीसारखी : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

X: @therajkaran शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सांगली (Sangli) येथे जनसंवाद सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल चढवला. ईडी, इनकम टॅक्स भाजपचे घरगडी झाले असले तरी माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. अजित पवारांना पक्षाचे चिन्ह वापरताना खाली सूचना द्यायला सांगण्यात आली आहे. सिगारेटच्या पाकिटावर सावधानतेचा इशारा दिला जातो, तशाच प्रकारे […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

Arvind Kejriwal : मद्य घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

X: @therajkaran लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरू असताना आता केंद्रीय तपास यंत्रणाही सक्रिय झाल्या आहेत. कथित मद्य घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाचे (ED) पथक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या घरी पोहोचले होते. तब्बल दोन तासांच्या चौकशीनंतर अखेर त्यांना  याप्रकरणीअटक करण्यात आलेली आहे. दिल्ली सरकारच्या कथित मद्य घोटाळा प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून ईडीनं […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sangli Lok Sabha : सांगलीत पैलवान चंद्रहार पाटीलच निवडणुकीचं मैदान लढणार!

X: @therajkaran लोकसभेसाठी सांगली (Sangli) मतदारसंघात काँग्रेस आणि ठाकरे यांचे जागेबाबत रस्सीखेच सुरू असतानाचं आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)सांगलीतून रणशिंग फुकले आहे. अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचं लागून राहिलेल्या सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे सांगलीच्या आखाड्यात पैलवान चंद्रहारच लढणार, चंद्रहार जिंकणार आणि हा महाराष्ट्राचा महाराष्ट्र डबल केसरीच […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

Ladakh :16 दिवसांपासून मीठ-पाण्यावर; लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक कोणत्या मागण्यांसाठी करतायेत उपोषण?

नवी दिल्ली : लडाखचे सामाजिक कार्यकर्ता, पर्यावरणतज्ज्ञ, शिक्षण सुधारक सोनम वांगचुक गेल्या 16 दिवसांपासून आमरण उपोषणावर आहेत.वांगचुक यांच्या उपोषणामागील कारणं काय आहेत? 21 मार्च 2024 वांगचुक यांच्या उपोषणाचा 16 वा दिवस आहे. वांगचुक गेल्या 16 दिवसांपासून सोशल मीडियावर आपल्या आमरण उपोषणाबद्दल सकाळी आणि रात्रीच्या वेळेत माहिती देत आहेत. वांगचुक यांनी आपल्या उपोषणाचं नाव क्लायमेट फास्ट […]