ताज्या बातम्या महाराष्ट्र

उद्योग पळवणाऱ्या मोदींना मुंबईतील आता काय विकायचं आहे ? ; राऊतांच टीकास्त्र

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi )यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या भूमीत प्रवेश केला आहे .आज ते मुंबईमधील (Mumbai)आरबीआयच्या वर्धापनदिनाच्या एका कार्यक्रमात सहभागी होणार असून, त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यांच्या याच दौऱ्यावर शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

केजरीवालांची तिहार तुरुंगात रवानगी? आज होणार फैसला

नवी दिल्ली : कथित मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले आहे. हजेरीसाठी न्यायालयात जात असताना अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान जे काही करत आहेत ते देशासाठी चांगले नसल्याची भावना व्यक्त केली. केजरीवाल यांची अंमलबजावणी संचालनालयाची कोठडी आज म्हणजेच १ एप्रिल रोजी संपत आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सांगलीचा तिढा सुटणार ; उद्धव ठाकरे काँग्रेसशी चर्चा करण्यास तयार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघातील जागेवरून (Sangli Lok Sabha Constituency) शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेसमध्ये (Congress) धुसफूस सुरु आहे . या मतदासंघात उद्धव ठाकरेंनी( Uddhav Thackeray )चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी घोषित केली आहे .मात्र या जागेचा काँग्रेसकडून अजूनही आग्रह केला जात आहे. पण ही जागा शिवसेनेकडेच( उद्धव ठाकरे गट) राहणार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

महायुतीचा मास्टरप्लॅन ; शिवसेना राष्ट्रवादीनंतर आता बीडच्या जय शिवसंग्राम पक्षातही फूट

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये राजकीय घडामोडीना वेग आला आहे . शिवसेना आणि राष्ट्रवादी पाठोपाठ आता बीडमधील विनायक मेटे (Vinayak Mete)यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम (Shiv Sangram)संघटनेत देखील फूट पडणार आहे . त्यांच्या निधनानंतर त्यांचे लहान भाऊ रामहरी मेटे (Ramhari Mete) यांच्याकडून जय शिवसंग्राम नावाची संघटना स्थापन करण्यात आली होती. आता या लोकसभेसाठी एकजण महाविकास […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महायुतीचा तिढा सुटला?, भाजपा 28 जागा लढणार, ठाणे, संभाजीनगर शिवसेनेकडे, नाशिकमधून भुजबळ?

मुंबई – महायुतीत गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला जागावाटपाचा तिढा अखेर सुटल्याचं मानण्यात येतंय. भाजपानं याआधीच २४ उमेदवारांची घोषणा केलेली आहे. अजून चार जागा भाजपा लढणार असं सांगण्यात येतंय. त्यानमुळं भाजपाच्या कमळ चिन्हावर एकूण २८ उमेदवार रिंगमात असणार आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेनं यापूर्वी आठ उमेदवारांची घोषणा केलेली आहे. त्यात आणखी चार ते पाच जागा शिंदेंच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा उमेदवार?, ठाण्याचा तिढा सोडवण्यासाठी कोणता फॉर्म्युला?

मुंबई- महायुतीत तीन ते चार जागांवरुन तिढा अद्याप कायम आहे. त्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि मुख्यमंत्री एकतनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याचा समावेश आहे. ठाणे परिसरात ठाणे, कल्याण आणि पालघर या तिन्ही मतदारसंघात शिवसेनेचे खासदार आहेत. त्यातील ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपाला मिळावा, यासाठी भाजपा नेते आग्रही असल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडे शिंदेंची शिवसेना हा मतदारसंघ […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

लोकसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न; दिल्लीच्या रामलीला मैदानात विरोधकांचं जोरदार शक्तिप्रदर्शन

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक केल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून ते तुरुंगात आहे. यावर निषेध व्यक्त करीत विरोधकांनी रविवारी ३१ मार्च रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानात शक्तिप्रदर्शन केलं. या जंगी सभेत राहुल गांधीसह सर्व नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं. काँग्रेसचे माजी पंतप्रधान राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर मॅचफिक्सिंगचा गंभीर आरोप […]

पाकिस्तान डायरी

माजीद ब्रिगेडने उडविले सुरक्षेचे धिंडवडे

X: @therajkaran गेल्या दोन आठवड्यांत झालेल्या दोन हल्ल्यांनी पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेचे पुरते धिंडवडे काढले आहेत. पहिला हल्ला ग्वादर बंदर (Gwadar port) प्राधिकरणाच्या परिसरात झाला आणि दुसरा पीएनएस सिद्दीक या नौदल तळावर (PNS Siddique naval airbase). या दोन्ही हल्ल्यांमध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे बलुचिस्तान (Balochistan) आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (Balochistan Liberation Army) संघटना. ग्वादर […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

अखेर जानकरांचं ठरलं ; परभणीतून लोकसभेच्या रिंगणात उतरणार

मुबंई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना परभणीत राजकीय घडामोडीना वेग आला आहे . गेल्या काही दिवसांपासून रासपचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar )लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत .अखेर आज त्यांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने (Ajit Pawar Group)त्यांच्या कोठ्यातून परभणीतून (Parbhani) उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare)यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती […]

महाराष्ट्र मुंबई

बारामतीतली लढत स्पष्ट, सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत निश्चित, इतर जागांचं काय?

मुंबई- अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची लढत आज अखेर घोषित झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. मतदारसंघात या दोन्ही उमेदवारांनी आधीपासूनच प्रचाराला सुरुवात केली असली तरी आता अधिकृत उमेदवारी घोषित झाल्यानं हा संघर्ष येत्या काळात अधिक जोमदार होण्याची […]