मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर दिल्लीत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे . या निवडणुकीत कोणत्या एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. पण एनडीएला 290 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. देशात सरकार स्थापन करण्यासाठी 272 जागा आवश्यक आहेत. एनडीएकडे सध्या बहुमत आहे. पण भाजपकडे बहुमत नाही. या पार्शवभूमीवरच आज दिल्लीत इंडिया आघाडीची( india aaghadi )बैठक होणार आहे . यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे(Uddhav thackeray) यांच्यासाठी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक थांबवण्यात आली आहे. विशेष म्हणजे ते दिल्लीत गेल्यानंतरच आघाडीची बैठक होणार आहे. दिल्लीतून निरोप ऐकल्यानंतर आता उद्धव ठाकरे हे सुद्धा दिल्लीला रवाना होण्याची शक्यता आहे.
दिल्लीत होणाऱ्या आजच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून खासदार संजय राऊत( Sanjay Raut), खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant )हे दिल्लीला बैठकीला गेले आहेत. पण इंडिया आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना या बैठकीला हजर राहण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे इंडिया आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी बैठक थांबवली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सरकार स्थापनेबाबत चर्चा केली जाणार आहे. सरकार स्थापनेसाठी जागांची जुळवाजुळव कशी करायची? याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीत नेमके काय खल होतात? ते पाहणं महत्त्वाच ठरणार आहे .
इंडिया पक्षांची ही बैठक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे( Mallikarjun Kharge) यांच्या घरी होणार आहे. या बैठकीशिवाय काँग्रेस पक्षाचीही बैठक होणार आहे. यामध्ये महायुतीच्या नेत्यांसोबतच्या बैठकीत काय भूमिका घ्यायची याचा निर्णय घेतला जाणार आहे. बैठकीनंतरच पुढील रणनीती सांगू, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खरगे यांनी निकालानंतर सांगितले होते. तर दुसरीकडे आम्ही देशातील सर्वात मोठा पक्ष आहोत. आम्हीही काँग्रेसची सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार आहे. आमच्याकडे सर्व फॉर्म्युले तयार आहेत. सगळे खासदारांना दिल्लीत बोलावलं आहे. आज खासदार दिल्लीत येणार असून सत्ता स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. दिल्लीत सरकार बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.