भंडारा- देशात सुरु असलेल्या लोकसभेच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धर्मावर बोलतात मात्र देशातील मुख्य समस्यांवर मात्र ते मौन बाळगून आहेत, अशी टीका राहुल गांधी यांना भंडाऱ्यात केलेली आहे. चांदूरवाफामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा पार पडली, त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. काही निवडक उद्योगपतींसाठी नरेंद्र मोदी यांनी सरकार चालवल्याची गंभीर टीका त्यांनी केली आहे.
अदानी यांच्यावर विशेष कृपादृष्टी
नरेंद्र मोदी यांची उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर विशएष कृपादृष्टी असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. मुंबई विमानतळ, सर्व बंदरे, रस्ते, कोळसा, वीज प्रकल्प हे अदानी आणि इतर ९-१० अब्जाधिशांना देण्यात आल्याची टीका राहुल यांनी केलीय. देशातील २२ अब्जाधीशांकडे देशातील ७० टक्के संपत्ती असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय.
मुख्य मुद्द्यांचं काय- राहुल
देशात महागाई, बेरोजगारी, शेतकरी यांचे मुख्य प्रश्न आहेत. मात्र त्यावर बोलण्यासाठी पंतप्रधानांकडे वेळ नसल्याची टीका राहुल गांधींनी केलीय. मोदी स्वताला ओबीसी म्हमवून घेतात, मात्र गेल्या १० वर्षांत त्यांनी ओबीसींसाठी काय केलं, असा सवाल राहुल यांनी विचारलेला आहे. ओबीसी यांच्यासाठी एकही योजना मोदींनी का आणली नाही, असा सवालही त्यांनी विचारलेला आहे.
हेही वाचाःस्मिता वाघ विरुद्ध करण पवार, कसा होणार जळगावमधला सामना?