नागपूर – महायुतीच्या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपाचा मोठा दबाव असल्यानं मुख्यमंत्री स्वताच्या मुलाची उमेदवारीही जाहीर करु शकत नाहीत, अशी घणाघाती टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. सध्या लोकसभेच्या जागेसाठी त्यांच्या हक्काच्या १३ जागा जर ते मिळवू शकत नसतील, तर विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा देण्यात येतील, असा सवालही जाधव यांनी विचारला आहे. यवतमाळ, रामटेक, मावळ यासारख्या महत्त्वाच्या जागांवर शिंदेंना तडजोड करावी लागतेय, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
भाजपनं आत्तापर्यंत २४ जागा जाहीर केल्या, मात्र महायुतीत इतर पक्षांना अद्याप पूर्ण जागा जाहीर करता आलेल्या नाहीयेत. शिंदे यांच्या शइवसेनेची पहिली ८ उमेदवारांची आणि काल ४ अशा १२ उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. तर अजित पवार यांच्याकडून आत्तापर्यंत केवळ ३ च जागांची घोषणा करण्यात आलेली आहे. परभणीची जागा महादेव जानकर यांना सोडण्यात आलीय.
अद्याप ९ जागांवर उमेदवार निश्चिती नाहीच
महायुतीत आत्तापर्यंत ३९ जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यातह काही जागांवर उमेदवार बदलण्याची वेळ शिंदेंच्या शिवसेनेवर आलीय. हिंगोलीतून हेमंत पाटील यांना दिलेली उमेदवारी बदलावी लागलेली आहे. इतर ९ जागी उमेदवारांची नावं अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.
कोणत्या ९ जागांची घोषणा नाही.
१. उत्तर मध्य मुंबई
२. उत्तर पश्चिम मुंबई
३. ठाणे
४. पालघर
५. कल्याण
६. नाशिक
७. छत्रपती संभाजीनगर
८. सातारा
९. रत्नागिरी-सिंधुदुर्ग
या नऊ जागांपैकी चार ते पाच जागांवर तिढा कायम असल्याचं सांगण्यात येतंय. आता हा तिढा कसा सुटणार याकडं सगळ्याचं लक्ष आहे.
हेही वाचाःकेंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपाकडून गैरवापर होतोय? भाजपात येणाऱ्यांची आकडेवारी काय सांगते?