गाझियाबाद – देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या वतीनं 400 पारचा नारा देण्यात आलाय. महाराष्ट्रासह देशभरात हे उद्दिष्ट गाठण्यासाठी भाजपा आणि एनडीएचे नेते कार्यरत असल्याचं दिसतं आहे. भाजपानं हा 400 पारचा नेरेटिव्ह सेट केलेला असताना, आता काँग्रेससह इंडिया आघाडीचे नेते इंडिया आघाडीला बहुमत मिळेल, असा दावा करताना दिसू लागले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही भाजपाला या निवडणुकीत किती जागा मिळतील याचा अंदाज व्यक्त केलाय.
भाजपाला 150 जागा मिळतील- राहुल गांधी
उत्तर प्रदेशात गाझियाबादमध्ये माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी भाजपाला किती जागा मिळतील या प्रश्नाचं उत्तर दिलंय. 15 दिवसांपूर्वी भाजपाला देशात 180 जागा मिळतील असं वाटत होतं. मात्र आता भाजपाला केवळ 150 जागा मिळतील असं दिसतंय, असं राहुल गांधी म्हणालेत. वेगवेगळ्या राज्यात सुरु असलेल्या प्रचाराचे दररोजचे रिपोर्ट आपल्याकडे येत असतात. त्यात इंडिया आघाडीचा प्रचार चांगला सुरु असल्याचं दिसतंय. असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात एक अंडर करंट असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
जागांचा नेरेटिव्ह सेट करण्याचा इंडिया आघाडीचाही प्रयत्न
गेले काही दिवसांपासून राज्यात मविआतील नेते त्यातही ठाकरेंच्या शिवसेनेकडून भाजपाला 45 पेक्षा जास्त जागा देशात मिळणार नाहीत, अशी टीका पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी केली. त्यानंतर संजय राऊत यांनी राज्यात महायुतीला 35 पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचं सांगत इंडिया आघाडीला देशात 305 जागा मिळतील असा दावा केलाय. भाजपापाठोपाठ आता काँग्रेस आणि इंडिया आघाडीवरुन बहुमताचा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय.
हेही वाचाःमविआ आणि महायुतीचे आज शक्तिप्रदर्शन; सुप्रिया सुळे, उदयनराजे, सुनेत्रा पवार आज दाखल करणार अर्ज