मुंबई- लोकसभा निवडणुकीत देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे असणार आहे. महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांनंतर सत्ताकारण पूर्णपणे बदललेलं आहे. अशा स्थितीत लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच सगळे पक्ष जनतेसमोर जाणार आहेत. त्यामुळं महायुती किंवा महाविकास आघाडीला लोकसभेत किती जागा मिळणार, याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींकडून प्रचंड विजयाचा अ्ंदाज व्यक्त केला जातोय. महायुतीला ४५ प्लस जागा मिळतील, असा अंदाज भाजपा नेते व्यक्त करतायेत. तर महाविकास आघआडी ३० जागांच्या वर जागा मिळवेल असा विश्वास, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून व्यक्त होतोय.
काय आहेत सर्व्हेंचे अंदाज?
या सगळ्यात आचारसंहिता लागू होण्यासाठी वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी राज्यात कुणाला किती जागा मिळतील याचे ओपिनियन पोल केलेले आहेत. मातब्बर संस्थांसोबत केलेल्या या पाहणीतही संभ्रम दिसतोय.
निवडणूकपूर्व सर्व्हेचे काय अंदाज?
एबीपी-सी व्होटर
महायुती 28, महाविकास आघाडी 20
झी न्यूज-मॅट्रिज
महायुती 45, महाविकास आघाडी 03
न्यूज 18 नेटवर्क
महायुती 41, महाविकास आघाडी 07
इंडिया टुडे
महायुती 22 , महाविकास आघाडी 26
इंडिया टीव्ही-सीएनएक्स
महायुती 35 , महाविकास आघाडी 13
टाईम्स नाऊ-ईटीजी
महायुती 36, महाविकास आघाडी 12
या सगळ्या अंदाजांवर नजर टाकली तर राज्यात नेमक्या कुणाला किती जागा मिळतील, याबाबत संभ्रमात भरच पडल्याचं दिसतंय.
महायुतीला 22 ते 45 पर्यंत जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
तर महाविकास आघाडीला 07 ते 26 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
फडणवीस यांचा काय अंदाज?
याबाबत देवेंद्र फडणवीस यांना आचारसंहितेपूर्वी विचारले असता, त्यांनी गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशापेक्षा जास्त यश महायुतीला मिळेल, असा विश्वास व्यक्त केलाय. 2019 लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला 41 जागा मिळाल्या होत्या. त्यापेक्षा जास्त जागा यावेळेस मिळतील, असं फडणवीस यांनी सांगितलेलं आहे.
मतदारराजा करणार परीक्षा
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून महायुतीत प्रवेश केलेला आहे. तर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत फूट पाडून महायुतीत प्रवेश केलाय. अशा स्थितीत शिवसेना आणि राष्ट्रवादी या राज्यातल्या दोन मोठ्या पक्षांचं मतविभाजन पाहायला मिळणार आहे. अशा स्थितीत पहिल्यांदाच महायुती आणि मविा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. अशात मतदारराजाा कौल कुणाला असेल, याची उत्सुकता मतमोजणीच्या दिवसापर्यंत असणार आहे.
हेही वाचाःशिवाजी पार्कवर इंडिया आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटणार, बैठकही होणार, रविवारी ऐतिहासिक सभा