ताज्या बातम्या महाराष्ट्र

15 दिवसात राज्याच्या राजकारण मोठे भूकंप होणार, भाजप नेत्याचे संकेत

मुंबई आज काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि काँग्रेसला धक्का बसला. तब्बल ५५ वर्षांपासूनचं काँग्रेससोबतच्या नात्याचा असा शेवट झाला. याबद्दल बोलताना मिलिंद देवराही भावुक झाले होते. दरम्यान भाजप मंत्र्यांनी राज्याच्या राजकारणात मोठे भूकंप होण्याची संकेत दिले आहे. त्यामुळे पुढील १५ दिवसात आणखी कोण महायुतीचा हात धरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यभरात महायुतीचे महामेळावे, राज्यातील 25 मंत्र्यांसह 52 प्रमुख नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी

मुंबई आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून तयारी सुरू झाली असून आज राज्यसभरात विविध जिल्ह्यांमध्ये महायुतीचे मेळावे आयोजित करण्यात आले. यावेळी राज्यातील २५ मंत्र्यांसह ५२ नेत्यांवर प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे. शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपमधील कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करून त्यांच्यात मनोमिलन व्हावे हे या मेळाव्यामागील महत्त्वाचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. जाणून घ्या कोणत्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आज मणिपूरमधून सुरू होणार काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा

नवी दिल्ली राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात आज मणिपूरमधून सुरू होणार आहे. इंडिगोच्या एका विशेष विमानाने राहुल गांधींसह अन्य काँग्रेस नेता दिल्ली विमानतळावरुन निघाले. वातावरण बिघडल्यामुळे विमानाला उशिर झाल्याचं सांगितलं जात आहे. सुरुवातीला ही यात्रा मध्य इंफालमधून सुरू होणार होती. मात्र मणिपूरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असल्याकारणाने मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी यात्रेची परवानगी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

राज्यातील नगरपरिषदांतील 100 टक्के रिक्त पदांची भरती करा, विजय वडेट्टीवारांची सरकारकडे पत्र लिहून मागणी

मुंबई राज्यातील नगरपरिषदातील संपूर्ण रिक्त पदे भरली पाहिजेत. परंतू सरकार एकूण रिक्त पदांच्या 40 टक्के पदांची भरती करत आहे. पेपरफुटीमुळे राज्यातील बेरोजगार परीक्षार्थी उमेदवार मेटाकुटीला आले आहेत. असे असताना फक्त 40 टक्के पद भरती करून सरकार बेरोजगार परीक्षार्थींवर अन्याय करत आहे. सरकारने बेरोजगारांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. नगरपरिषदातील संपूर्ण 100 टक्के रिक्त पदांची भरती करावी, […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मोठी बातमी! काँग्रेसला झटका; पक्षातील युवा चेहऱ्याने सोडला पक्ष, कोणाच्या शिवसेनेत घेणार प्रवेश?

मुंबई लोकसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसचा जबर धक्का बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसमधील युवा चेहरा मिलिंद देवरा आज शिवसेनेत सामील होणार आहेत. आगामी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून पक्षबांधणी मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू असताना मिलिंद देवरा यांनी पक्षाला राम राम ठोकला आहे. आज दुपारी २ वाजते ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

‘रिलायन्स ही गुजराती कंपनी…’, तर तुमचा सगळा बाडबिस्तरा गुंडाळा, गुजरातला जाऊन बसा; अंबानींच्या वक्तव्यावर मनसे आक्रमक

मुंबई रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी वायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये केलेल्या वक्तव्यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तिखट प्रतिक्रिया देत गुजराती कंपनी असेल तर तुमचा सगळा बाडबिस्तरा गुंडाळा, अँटिलिया पण गुंडाळा आणि गुजरातला जाऊन बसा, महाराष्ट्रात काय करता? असा सवाल उपस्थित केला. यावेळी पुढे ते म्हणाले, रिलायन्स […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘आमदार फोडणाऱ्यांकडून आता पेपर फोडणाऱ्यांना संरक्षण’; तलाठी भरती घोटाळ्याच्या SIT चौकशीसाठी युवक काँग्रेस रस्त्यावर

मुंबई राज्य शासनाने सारथी, बार्टी, महाज्योतीकडून पीएचडीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येते. यासाठी आयोजित केलेल्या प्रवेश परीक्षेत सीलबंद प्रश्नपत्रिका आणि सील नसलेल्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर पेपरफुटीचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार घातला. त्यावर संतप्त विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे सारथी कार्यालयावर मोर्चा काढला. काही विद्यार्थ्यांनी बार्टी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. परीक्षेत […]

ताज्या बातम्या

घराणेशाहीवरुन टीका करणाऱ्या शिंदेंना दानवेंचं प्रत्युत्तर; भाजपची घराणेशाहीची यादीच दिली, पहिलं नाव फडणवीसांचं!

मुंबई विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणातील निकाल जाहीर केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत काढल्याची टीका केली. यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवे यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या ज्या नेत्यांची घराणेशाही सुरू आहे, अशांची यादी सोशल मीडियावर शेअर केली आहे. या यादीच तब्बल २१ जणांची […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही हे एकनाथ शिंदे सिद्ध करतील का?’ घराणेशाहीच्या वक्तव्यावर राऊतांचा पलटवार

मुंबई विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणातील निकाल जाहीर केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत काढल्याची टीका केली. आता संजय राऊतांनीही यावर पलटवार केला आहे. यावेळी राऊत म्हणाले, श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदेंचा मुलगा नाही का? एकनाथ शिंदे घराणेशाहीचा अंत झाल्याचं म्हणतात मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का? सिद्ध करा नाही […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘लोकशाही’ भावपूर्ण श्रद्धांजली! आमदार अपात्रता निकालावर संतापलेल्या राऊतांचं ट्विट

मुंबई आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला निकाल लोकशाही विरोधात असल्याचा घणाघात संजय राऊतांनी केला आहे. ही मॅच फिक्स होती असंही ते यापूर्वी म्हणाले आहेत. आज त्यांनी स्वत:च्या सोशल मीडियावरुन एक फोटो पोस्ट केला आहे. लोकशाही भावपूर्ण श्रद्धांजली वाहणारा हा फोटो आहे. यात १९५० – २०२३ असं वर्ष लिहिलं असून शोकाकुलच्या पुढे महाराष्ट्राचा […]