जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नरेंद्र मोदी कधी बोलणार? राहुल गांधींचा भंडाऱ्याच्या सभेत सवाल

भंडारा- देशात सुरु असलेल्या लोकसभेच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धर्मावर बोलतात मात्र देशातील मुख्य समस्यांवर मात्र ते मौन बाळगून आहेत, अशी टीका राहुल गांधी यांना भंडाऱ्यात केलेली आहे. चांदूरवाफामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा पार पडली, त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. काही निवडक उद्योगपतींसाठी नरेंद्र मोदी यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भाजपाचे स्लीपर सेल’ वंचित बहुजन आघाडी काय करेतय आरोप?, किती आहे तथ्य?

मुंबई- अकोल्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं संताप व्यक्त केलाय. काँग्रेसचा उमेगवार हा संघ विचारांचा असल्याचा प्रचार सध्या अकोल्यात करण्यात येतोय. चार वेळा या मतदारसंघातून निवडून आलेल्या संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रेंना भाजपानं तिकिट दिलंय. तर वंचितचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर या मतदारसंघातून रिंगणात आहेत. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

काँग्रेसने देशाला खड्ड्यात घालण्याचं काम केलंय ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा घणाघात

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे . आज चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचार सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी काँग्रेसने (Congress) प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका केली आहे . ‘काँग्रेसने ५० वर्षांच्या काळात जेवढी कामं झाली नाहीत. तेवढी कामं मोदींच्या काळात झाली हा इतिहास […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

“… तर राहुल गांधींनी पक्षातून बाजूला व्हावं “; रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा सल्ला

मुंबई : देशासह राज्यात लोकसभेसाठी राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला असताना आता रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना राजकारणातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती समोर आली आहे . गेल्या दहा वर्षात राहुल गांधी यांनी स्वतःही काही केलं नाही आणि पक्षात दुसऱ्या कुणालाही काही करायला दिलं नाही, २०१४च्या […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

काँग्रेसच्या 48 पानांच्या न्यायपत्रात 10 विषयांना प्राधान्य; राहुल गांधींकडूनही 25 गॅरेंटी

दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पी चिदम्बरम या नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा उल्लेख न्यायपत्र असा करण्यात आला आहे. 48 पानांच्या या न्यायपत्रात 10 विषयांना प्राधान्य देण्यात आलं आहे. काँग्रेसच्या न्यायपत्रातील प्रमुख 10 विषय १. समता२. युवाशक्ती३. महिला४. शेतकरी५. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राष्ट्रीय

राहुल गांधींकडे केवळ 55 हजारांची कॅश, म्युचअल फंडात कोट्यवधींची गुंतवणूक, राहुल गांधींची संपत्ती तरी किती?

नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघआतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात आलं. उमेदवारी दाखल करताना संपत्तीचं प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं. त्यात राुल गांधी यांच्याकडे केवळ ५५ हजार रुपयांची कॅश असल्याची माहिती दिली आहे. तर २०२२-२३ या आर्थिक वर्षात राहुल गांधी यांचं उत्पन्न हे १ कोटी ०२ लाख ७८ […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

राहुल गांधींनी वायनाडमध्ये इंडिया आघाडीतील मित्रपक्षाविरोधात शड्डू ठोकला; यंदाची निवडणूक किती कठीण?

वायनाड : काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित जागा म्हणून केरळमधील वायनाड मतदारसंघाकडे पाहिले जाते. यंदाही राहुल गांधींनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र या मतदारसंघातून राहुल गांधींनी इंडिया आघाडीतील मित्रपक्षाविरोधात शड्डू ठोकला आहे. उत्तर भारतात काँग्रेसकडून इंडिया आघाडी एकजूट राहण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे दक्षिण भारतात मात्र इंडिया आघाडीला फारसं महत्त्व दिलं जात नसल्याचं स्पष्ट […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

काँग्रेसला आणखी 1745 कोटींची नोटीस, एकूण करथकबाकी 3,567 कोटींच्या घरात

नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाकडून पुन्हा एकदा काँग्रेसला थकबाकीची नोटीस बजावण्यात आली आहे. आता काँग्रेसला तब्बल १७४५ कोटींची नोटीस बजावण्यात आली आहे. २०१४-१५ ते २०१६-१६ या मूल्यांकन वर्षासाठी ही थकबाकी पाठवण्यात आली असून त्यामुळे काँग्रेसच्या प्राप्तिकराची एकूण करथकबाकी ३,५६७ कोटींच्या घरात गेली आहे. लोकसभा काही दिवसांवर येऊन ठेवलेली असताना काँग्रेसला करथकबाकीची नोटीस बजावण्यात आली आहे. […]

ताज्या बातम्या मुंबई राष्ट्रीय

‘माझ्याकडे निवडणूक लढवण्याइतपत पैसे नाहीत’, काय म्हणाल्या देशाच्या अर्थमंत्री? सीतारमण यांची नेमकी संपत्ती किती?

नवी दिल्ली- लोकसभा निवडणूक लढवण्याचा भारतीय जनता पार्टीनं दिलेला प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी फेटाळला आहे. या प्रस्ताव फेटाळताना त्यांनी दिलेल्या कारणाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी ज्या प्रकारचा पैसा लागतो, तो आपल्याकडे नाही, असं प्रांजळपणे त्यांनी सांगितलेलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सीतारमम यांना आंध्र पदेश किंवा […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत 190 उमेदवारांच्या नावांची घोषणा, महाराष्ट्रातील किती नावं समोर?

नवी दिल्ली : काँग्रेसने सोमवारी २५ मार्च रोजी पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये राजस्थानमधून चार आणि तमिळनाडूतून एका उमेदवाराचा समावेश आहे. कोटामधून प्रल्हाद गुंजल, अजमेरहून रामचंद्र चौधरी, राजसमंदहून सुदर्सन सिंह रावत, भीलवाडाहून दामोदर गुर्जर यांना तिकीट देण्यात आलं आहे. गुंजल या राजस्थानातील भाजप नेत्री आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे निकटवर्तीय आहेत. ते […]