मुंबई- लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला रंगत येण्यास सुरुवात झालेली आहे. प्रचारात सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आघाडी घेतल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करत असून ठिकठिकाणी सभा घेतायेत. त्यातच संजय राऊत हेही प्रचारासाठी फिरताना दिसतायेत. यात ठाकरे आणि राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत त्यांची तुलना औरंगजेबाशी केलीय. त्याला आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उत्तर दिलंय.
काय म्हणालेत संजय राऊत-ठाकरे ?
बुलढाण्याच्या उद्धव ठाकरेंच्या प्रचार सेभत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. पंतप्रधान मोदी नाही, तर औरंगजेब म्हणा अशी टीका संजय राऊत यांनी केली. औरंगजेब गुजरातमध्ये जन्माला आला, त्याच्या जवळच्या गावातच पंतप्रधान मोदींचा जन्म झाल्याचं राऊत म्हणालेत. याच कारणामुळे मोदी हे औरंगजेबासारखा विचार करतात अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. तर उद्धव ठाकरेंनीही संजय राऊतांची टीका पुढे नेत मोदी आणि शाहा यांची प्रवृत्ती ही औरंगजेबासारखी असल्याची टीका केली होती.
पंतप्रधानानांचं काय उत्तर?
उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजपाच्या नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पराभव दिसत असल्यानं ठाकरे आणि राऊत यांच्यावर मानसिक परिणाम झाल्याची टीका भाजपा नेते करतायेत. तर दुसरीकडे पंतप्रधानांनीही या टीकेची दखल घेतलीय.
पंतप्रधान मोदी म्हणालेत, आमचे विरोधकही निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यांनी माझ्याविषयी 104थं दूषण वापरलंय. मला औरंगजेब केलं गेलंय. मोदींचा शिरच्छेद करा अशी घोषणा केली गेली आहे. अशा सगळ्या नकारात्मक गोष्टी सुरु असल्या तरीही लोकशाहीचा उत्सव सुरु आहे. २६०० हून जास्त पक्ष. ९७ कोटी मतदार, दोन कोटी पहिल्यांदा मतदान करणारे मतदार या उत्सवात सहभागी होत आहेत.
औरंगजेबाचा जन्म कुठं झाला?
गुजरातमध्ये दाहोद परिसरात मोरबीच्या किल्ल्यावर १६ व्या शतकात औरंगजेबाचा जन्म झाला.
गुजरातच्या दुधमती नदीच्या तीरावर दाहोद हे शहर वसलेलं आहे. दधीचीा यांच्या आश्रमामुळे या गावाचं नाव दाहोद असं ठेवण्यात आलंय. दोहादचा आणखी एक अर्थ म्हणजे दोन सीमा राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या सीमा जवळ असल्यानं हे नाव पडल्याचंही सांगण्यात येतंय. आता दाहोद गुजरातमधील एक विकसित शहर म्हणून ओळखलं जातं.