महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत; याच अधिवेशनात सरसकट कर्जमाफी करा – नाना पटोले

मुंबई : “देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या राज्यासाठी भूषणावह नाहीत,” अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत केली. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत त्यांनी सरकारवर तीव्र हल्लाबोल केला आणि याच अधिवेशनात सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली. ते म्हणाले, “शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य केंद्रावर विकले, पण वर्षभर झाले तरी पैसे नाहीत. बँका व्याज आकारत आहेत, शेतकऱ्याला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठीवर आक्रमण सहन करणार नाही; काँग्रेसचा लढा सुरूच राहील – हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : “मराठी ही केवळ भाषा नाही, ती महाराष्ट्राच्या अस्मितेचा आत्मा आहे. तिच्या रक्षणासाठी काँग्रेसचा लढा अखंड सुरू राहील,” असा ठाम निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज व्यक्त केला. मराठी माध्यमावर हिंदी लादण्याचा प्रयत्न हा केवळ भाषिक अन्याय नाही, तर सांस्कृतिक गुलामगिरीकडे नेणारा धोका आहे, असा आरोप त्यांनी केला. राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्ती […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

गुटखा विक्रीवर सत्ताधाऱ्यांकडूनच सवाल; एफडीएच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

मुंबई – राज्यात २०१२ पासून गुटखा, पान मसाला आणि सुगंधित सुपारीच्या विक्रीवर बंदी असतानाही या वस्तू खुलेआम विकल्या जात असल्याचा मुद्दा आज विधानसभेत सत्ताधाऱ्यांकडूनच ऐरणीवर आला. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अशा उत्पादनांच्या जाहिराती करून युवापिढीला व्यसनाधीन करत असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. मनोज घोरपडे, श्वेता महाले आणि विक्रम पाचपुते यांनी नियम क्रमांक 105 अंतर्गत यासंदर्भात लक्षवेधी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

संगमेश्वर भूमाफिया प्रकरणात SDO निलंबित; कठोर कारवाईची घोषणा

मुंबई – संगमेश्वर (जि. नाशिक) येथील सिटी सर्व्हे क्रमांक १४४ या जमिनीच्या गैरव्यवहारप्रकरणी भूमाफियांविरोधात कडक कारवाई होणार असून, संबंधित उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांना निलंबित करण्यात येत आहे. त्यांच्यावर महिन्याभरात विभागीय चौकशी करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

गणवेश खरेदीत कोणतीही अनियमितता नाही – डॉ. उईके

मुंबई – आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी प्रकरणात कोणतीही अनियमितता झालेली नाही, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी विधानसभेत स्पष्ट केले. उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी या खरेदीप्रकरणी प्रश्न विचारला होता. उत्तर देताना मंत्री उईके म्हणाले की, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये शालेय गणवेश, पी.टी. ड्रेस आणि नाईट ड्रेस खरेदी करताना उद्योग, ऊर्जा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अनुसूचित जाती व जमातींसाठी स्वतंत्र आयोगाची आवश्यकता होतीच! – विधान परिषदेत सत्यजीत तांबे यांचा ठाम मुद्दा

मुंबई – विधान परिषदेतील विधेयकावर सविस्तर चर्चा करताना आमदार सत्यजीत तांबे यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र आयोगाची गरज अधोरेखित करत या विधेयकाचे स्वागत केले. मात्र, केवळ आयोग स्थापनेपुरते न थांबता, त्याची अंमलबजावणी प्रभावी आणि सर्वसमावेशक व्हावी यासाठी त्यांनी काही स्पष्ट आणि ठोस सूचना सभागृहात मांडल्या. तांबे यांनी सभागृहात बोलताना स्पष्टपणे सांगितले की, “आदिवासी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पुणे वाहतूक कोंडीवर उपाययोजना सुरू – राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे विधानसभेत उत्तर

मुंबई: राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या पुणे शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर आज विधानसभेत जवळपास तासभर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले की, पुण्यातील वाहतूक सुधारण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत असून, या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. पुण्यातील आमदार सुनिल कांबळे यांनी विधानसभा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आम आदमी पार्टीमुळे पालिका शाळांतील नगरसेवक कोटा खुला

पुणे : गेल्या तीन वर्षांपासून पुणे महानगरपालिकेच्या काही शाळांमध्ये नगरसेवकांच्या शिफारसीनुसार भरला जाणारा विद्यार्थ्यांचा कोटा रिकामा राहिला होता. निवडणुका न झाल्यामुळे नगरसेवक पदे रिक्त असून, त्यामुळे काही मुलांचे प्रवेश रखडले होते. या मुद्द्यावर आम आदमी पार्टीचे मनोज शेट्टी व श्रद्धा शेट्टी यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर, अखेर महापालिका प्रशासनाने हा कोटा खुल्या पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

तळीये दरडग्रस्तांचे पुर्नवसन तातडीने करा – अंबादास दानवे यांची विधान परिषदेत मागणी

मुंबई : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेला चार वर्षे होत आली, तरी आजही सर्व दरडग्रस्त कुटुंबांचे पुर्नवसन झालेले नाही, ही बाब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहाच्या निदर्शनास आणली. दानवे म्हणाले, “या दुर्घटनेत ६६ लोकांचा मृत्यू झाला. शासनाने पुनर्वसनाचे आश्वासन दिले होते, मात्र केवळ ६६ कुटुंबांनाच घरे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा; कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या – विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत जोरदार मागणी

मुंबई : शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पायदळी तुडवून त्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप करत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत सरसकट कर्जमाफीची जोरदार मागणी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर २९३च्या प्रस्तावावर बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारवर तीव्र टीका केली. वडेट्टीवार म्हणाले की, निवडणुकीपूर्वी कोरडवाहू पिकांसाठी १३,५००, बागायतीसाठी २७,०००, तर फळबागांसाठी ३६,००० रुपये मदतीचे आश्वासन देण्यात […]