महाराष्ट्र ताज्या बातम्या

शरद पवारांची पलटी…

शरद पवारांची नवी राजकीय खेळी मराठवाड्यात चर्चेचा विषय ठरत आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या वृत्ताने मराठवाड्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत स्पष्टता झालेली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत सत्ता काबीज करण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या शरद पवारांना आता अजित पवार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार

उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील खारपाण पट्ट्याला 5.78 लाख एकर सिंचनलाभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भोपाळ : तापी नदीवर आधारित महत्त्वाकांक्षी “तापी मेगा रिचार्ज प्रकल्पा”बाबत आज महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सरकारांमध्ये ऐतिहासिक सामंजस्य करार झाला. सुमारे ₹19,244 कोटी खर्चाच्या या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील खारपाण पट्ट्याला मोठा सिंचनलाभ होणार असून, 5.78 लाख एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबई शिक्षक मतदारसंघ प्रकरणात आमदार अभ्यंकर यांना मोठा झटका; सुभाष मोरे यांच्या याचिकेवर सुनावणी होणार

मुंबई : मुंबई शिक्षक मतदार संघातील उबाठा गटाचे आमदार जे. एम. अभ्यंकर यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायमूर्ती गौरी गोडसे यांनी त्यांच्या याचिका फेटाळत शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष मोरे यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेवर सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. जुलै २०२४ मध्ये पार पडलेल्या या निवडणुकीत अभ्यंकर २०८ मतांनी विजयी झाले होते. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्र विधानमंडळ समित्यांचे एकत्रित उद्घाटन १४ मे रोजी विधानभवनात

मुंबई – महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०२४-२५ या वर्षासाठी गठित करण्यात आलेल्या विविध समित्यांच्या एकत्रित उद्घाटन सोहळ्याचे आयोजन बुधवार, १४ मे २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता विधानभवनाच्या चौथ्या मजल्यावरील मध्यवर्ती सभागृहात करण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर तसेच विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे मार्गदर्शन करणार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

IMF च्या पाकिस्तानसाठी कर्जमंजुरीवर क्लाईड क्रास्टो यांचा संतप्त सवाल: “आंतरराष्ट्रीय दहशतवादाला मिळालेली मान्यता”

मुंबई – पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून $1 अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी तीव्र शब्दात टीका केली आहे. त्यांनी या निर्णयावर संताप व्यक्त करत हा निधी भारतातील नागरिकांच्या हत्यांसाठी जबाबदार असलेल्या दहशतवादाला अप्रत्यक्षपणे मदत करणारा असल्याचा आरोप केला आहे. ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना क्लाईड क्रास्टो […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

१८ वर्षे रखडलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग: सरकारचं अपयश?

इंदापूर-माणगाव बायपास रखडल्यामुळे प्रवासी त्रस्त; वाहतूक कोंडीने नाकेबंदी महाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चं काम तब्बल १८ वर्षांपासून सुरु असूनही अद्याप पूर्णत्वास गेलेलं नाही. विशेषतः इंदापूर आणि माणगाव या दोन ठिकाणी बायपास न झाल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी कोकणातील प्रवाशांसाठी मोठं संकट ठरत आहे. सण-वार, सुट्ट्यांच्या काळात तर परिस्थिती आणखी बिकट होते. ४८० किलोमीटर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

India – Pak War : युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन टंचाईचा धोका; रायगड जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश

महाड : भारत आणि पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे राज्यात पेट्रोल, डिझेल आणि रॉकेलसह इतर इंधनाच्या टंचाईचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी जिल्ह्यातील सर्व इंधन पुरवठादार व रेशन दुकानदारांना पुरेसा साठा राखण्याच्या स्पष्ट सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. सोनवणे यांनी आज ‘पुशा/कात-5/युद्धजन्य परिस्थिती 2025/885’ या क्रमांकाच्या परिपत्रकात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad : मुठवली व केंबुर्ली येथील वाळू डेपोवर धाड – ओरिएंटल लिमिटेड कंपनीवर कारवाई

महाड : महाड जवळील सावित्री खाडीपात्रात मुठवली आणि केंबुर्ली या ठिकाणी सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उत्खननावर जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी केलेल्या धडक कारवाईत सुमारे ३० लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार महेश शितोळे यांनी दिली. १ मे, महाराष्ट्र दिनाच्या रात्री, खनिकर्म विभागाच्या पथकाने अचानक छापा टाकत मुठवली येथील ओरिएंटल लिमिटेड कंपनीच्या वाळू […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) पुढील पाच वर्षांत दरवर्षी ५ हजार अशा एकूण २५ हजार नव्या बस खरेदी करणार असून, यापैकी २० हजार बसेस पर्यावरण पूरक हायब्रीड इंधनावर चालणाऱ्या असतील. या बसेस सीएनजी आणि एलएनजीसारख्या स्वस्त आणि पर्यावरण अनुकूल इंधनासोबत आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी डिझेल इंधनावर देखील चालू शकतील, अशी माहिती परिवहन मंत्री […]

मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; सज्जतेसाठी राज्यभरात युद्धपातळीवर उपाययोजना

मुंबई : भारत आणि पाकिस्तानदरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील एकूणच सुरक्षेचा आणि प्रशासनाच्या सज्जतेचा उच्चस्तरीय आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यावेळी उपस्थित होते. या बैठकीत मॉकड्रिल, ब्लॅकआऊट, सायबर हल्ल्यांचा धोका, जनजागृती, आणि शत्रूराष्ट्राच्या मदतीसाठी वापरली जाणारी सामाजिक माध्यमे यांसह विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागांना […]